एटापल्ली;-तालुका मुख्यलयातील बस स्थानकजवळ हेमास्ट लाईट हे मागील पंधरा दिवसापासून
नगरपंचायतीच्या दुर्लक्षामुळे दिवसा चालू असल्याचे निदर्शनास येते
मागील 15 दिवसापासून हेमास्ट लाईट दिवसा कुणाला उजेड देते असा सवाल भारतीय कम्युनिष्ठ पार्टी एटापल्ली शाखेने मुख्याधिकारी नगरपंचायत एटपल्लीला खुलासा मागितला आहे
सदर भाकपा ने अशे म्हटले आहे की हेमास्ट लाईट दिवसा बंद ठेवणे अत्यंत आवश्यक आहे दिवसा हेमास्ट लाईट चालू ठेवणे अपव्यय आहे
या मुळे नगरपंचायतीवर आर्थिक बोजा वाढते आणि नगरपंचायत कराच्या स्वरूपात नागरिकांच्या खिशाला कात्री लावते
दिवसा हेमास्टलाईट चालू असल्यामुळे वातावरणावर परिणाम होऊन नकारात्मक परिणाम निर्माण होतो
या सर्व बाबींचा विचार करून हेमास्ट लाईन दिवसभर बंद ठेऊन रात्रौ उपयोग करावा अशी मागणी केली आहे या वेळी
भाकपा सचिव कॉ.सचिन मोतकूरवार ,कॉ.शरीफ शेख कॉ.विशाल पूजलवार कॉ. सुरज जक्कुलवार उपस्तीत होते

0 Comments