अपघात की हत्या? सुरजागड मालवाहतूक गाड्यांमुळे आणखी एक बळी; कमला एलेलवार यांचा जागीच मृत्यू






शिवणी (पाट): दीना नदी पुलियावर पुन्हा एकदा मृत्यूचा सापळा! दिनांक 3 एप्रिल 2025 रोजी दुपारी 1 ते 2 च्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात कमला संजय एलेलवार (वय 35, रा. बोरी) यांचा जागीच मृत्यू झाला. एक अज्ञात चारचाकीने दिलेल्या जोरदार धडकेत त्या जागीच कोसळल्या.




कमला एलेलवार या MH 33 AB 3203 क्रमांकाच्या दुचाकीने अहेरीकडे जात होत्या. मात्र, दीना पुलाजवळ मागून आलेल्या अज्ञात वाहनाने त्यांना धडक दिल्याने कमलाचा जागीच मृत्यू झाला . ही फक्त एक अपघाताची घटना नाही, तर वाहतूक व्यवस्थेतील गंभीर ढिसाळपणाची साक्ष आहे.




या भागातील नागरिक आक्रोश व्यक्त करत आहेत की, अपघाताचे मुख्य कारण म्हणजे सुरजागड प्रकल्पाची बेफाम मालवाहतूक! मुत्तापूर ते आष्टी मार्गावर दिवस-रात्र ट्रकांचा रिळ सुरू असतो. दर 15 मिनिटांनी एक ट्रक, वाहतुकीचा रस्ता व्यापून टाकतो. सामान्य नागरिकांना ना सुरक्षित जागा, ना मोकळा मार्ग! जणू हा महामार्ग सुरजागड कंपनीने खाजगी करून टाकला आहे.




"ही फक्त एक कमला नव्हे, उद्या कोणीही असू शकतो!" अशा शब्दांत नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. प्रशासनाकडे वेळोवेळी तक्रारी करूनही दुर्लक्ष होत असल्याचा आरोप आहे


.


अपघातानंतर चारचाकी वाहन फरार झाले असून, पोलीस तपास सुरू आहे. मात्र या अपघाताच्या मुळाशी जाऊन, सुरजागड ट्रक वाहतुकीवर नियंत्रण ठेवले नाही, तर मृत्यूचे हे सत्र थांबणार नाही.

Post a Comment

0 Comments