वनतस्करीचा दंड भरायला रेती चोरी आंबटपल्ली ग्रामपंचायत 'पदाधिकाऱ्याचा' गुन्हेगारी महामार्ग




गोमनी;-जंगलाची लूट,नद्यांचं खोबरं – आणि हे सगळं करताना गळ्यात ग्रामपंचायतीचा गळाफास! गोमनी परिसरात धक्कादायक बाब उघड झाली आहे की, आंबटपल्ली ग्रामपंचायतीचा पदाधिकारीच आता पुन्हा रेती तस्करीत कडे वळला आहे.

एकीकडे वनतस्करीप्रकरणी लाखोंचा दंड बसतो आणि दुसरीकडे तोच दंड फेडण्यासाठी आरोपी पुन्हा तस्करीच्या दलदलीत शिरतो – ही कोणत्या 'सिस्टम'ची शोकांतिका?


गावाच्या नावे काळं डागणारा 'पदाधिकारी'!

या व्यक्तीवर याआधीच जंगलातील लाकूडतोड प्रकरणात दंडात्मक कारवाई झाली होती.

पण शिक्षा वठवून सुधारणेऐवजी, याने सरळ दुसऱ्या तस्करीचा रस्ता पकडला!

त्याहीपेक्षा गंभीर म्हणजे – २०२३-२४ सालच्या तेंदूपत्ता मजुरीमध्येही हा इसम गैरव्यवहाराचा केंद्रबिंदू ठरल्याची माहिती समोर येते आहे.

म्हणजे गावकऱ्यांचा हक्काचा पैसा लुबाडायचा आणि वरून नैसर्गिक संपत्तीची चोरी करायची?

प्रशासन 'दंडावर समाधानी,पण तो पुन्हा गुन्हेगारच!वनविभाग दंड ठोठावतो, पण आरोपी दंड भरायला पुन्हा तस्करी करतो –

ही कोणती न्यायव्यवस्था?

ग्रामपंचायतीचा पदाधिकारी असणारा हा इसम, खरंतर गावासाठी मार्गदर्शक असायला हवा होता. पण इथे तोच गावाला लुटतो आहे!

याचा चेहरा, नाव, आणि कृत्यं सगळं जनतेसमोर येणारच!"

कारवाई होईपर्यंत हा इसम 'पदाधिकारी' म्हणून बसलेला असणं हे संपूर्ण गावासाठी लाजिरवाणं आहे.

'वनतस्कर' रेतीतस्कर तेंदूपत्ता लूट या प्रकरणातील या पदाधिकारीचा मुखवटा उतरवणार!

संपूर्ण माहिती,नाव आणि पुराव्यांसह, लवकरच फोटोसह वृत्त प्रकाशित करण्यात येणार आहे.

गाव, जंगल आणि नद्या लुटणाऱ्याला समाजाच्या कोर्टातही शिक्षा होणारच!

Post a Comment

0 Comments