उत्खननावर कारवाई झाल्यानंतरही कंत्राटदाराची मुजोरी;पुन्हा खोदली मुरूम




वनविभागाच्या कारवाईनंतरही कांदोळी परिसरात पुन्हा सुरू झाले मुरूम उत्खनन;


 झाडांना इजा, झाडांची मुळे तोडली








कांदोळी: पेरमिली वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या कांदोळी परिसरात मुरूम उत्खननावर कारवाई होऊनही कंत्राटदाराने पुन्हा त्याच ठिकाणी खोदकाम केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. यामुळे वनविभागाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.


दिनांक 31 जानेवारी 2025 रोजी कांदोळी रस्त्यावर कंत्राटदाराने अवैधरित्या मुरूम उत्खनन करून रस्त्याचे काम सुरू केले होते. या प्रकरणाची बातमी "खबरदार महाराष्ट्र न्यूज नेटवर्क" या माध्यमाने प्रकाशित केल्यानंतर पेरमिली वनपरिक्षेत्र अधिकारी चौके यांच्या मार्गदर्शनाखाली वनविभागाने तात्काळ कारवाई केली होती. यामध्ये सुमारे 1200 मीटर क्षेत्रात मुरूम उत्खनन झाल्याचे निष्पन्न झाले असून, कंत्राटदारावर 3,25,200 रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला होता




तथापि, कारवाईनंतरही कंत्राटदाराची मुजोरी कमी झाली नसून त्याच ठिकाणी पुन्हा जेसीबीच्या साहाय्याने मुरूम काढण्यात आले आहे. रस्त्याच्या कडेला लहान लहान खड्डे मारून मुरूम उत्खनन चालू आहे. विशेष म्हणजे, या ठिकाणी झाडांची मुळे तोडण्यात आली असून काही झाडांना प्रत्यक्ष इजाही पोहोचवण्यात आली आहे. या रस्त्यावर सध्या ४ लहान पुलियांचे कामही सुरू असून त्यासाठीही वनजमिनीचा वापर व अवैध रेतीचा वापर केला गेलेला आहे




या प्रकारावर भारतीय मानवाधिकार परिषदेचे जिल्हाध्यक्ष विश्वदीप वाळके यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. “वनविभागाने त्वरीत कठोर कारवाई करावी, अन्यथा मुख्य वनसंरक्षक गडचिरोली यांच्याकडे तक्रार दाखल करण्यात येईल,” असा इशाराही त्यांनी दिला आहे.


वनपरिक्षेत्र अधिकारी यांची भूमिका काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Post a Comment

0 Comments