शेतीला दिवसाचे 12 तास विज या दिलेल्या आश्वासनाचे ऊर्जामंत्री यांना पडला विसर पडला आहे. रब्बी धान पिकाला सुरळीत पाणीपुरवठा व्हावा, यासाठी 12 तास दिवसाचे वीजेच्या मागणीसाठी चोप, कोरेगाव ,किन्हाळा, मोहटोला , पोटगाव ,विहीरगाव ,बोळधा, कसारी ,डोंगरगाव ,विसरा व देसागंज तालुक्यातील शेतकऱ्यांनी विविध मागण्यासाठी देसाईगंज येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयावर मोर्चाच्या माध्यमातून 26 तारखेला धडक देऊन आमरण उपोषणासाठी या आंदोलनाला सुरुवात केली.
आज चौथ्या दिवस असून, प्रशासनाने या आंदोलनाकडे अजून पर्यंत कुठलाही दखल घेतली नाही. शेतकरी वर्गात सत्ताधाऱ्यांच्या विरोधात नाराजीचा सूर वाढलेला आहे. रब्बी धान पिकांची रोवनी होऊन महिना उलटत आहे. तर रात्रीच्या आठ तास तेही अनियमित वीज पुरवठ्यामुळे जमिनीला भेगा पडून उभे दान पीक करपत आहे. ऊर्जामंत्री यांनी पंधरा दिवसाआधी शेतीला दिवसाचे बारा तास वीज पुरवठा करण्याचे आश्वासन देऊन, सुद्धा त्यांचा विसर पडल्याने, देसाईगंज येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयावर देसाईगंज तालुक्यातील शेतकर्यांनी विविध मागण्यासाठी मोर्चा काढला. शेतकऱ्यांचे प्रतिनिधी श्याम पाटील मस्के यांनी आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे.
आज चौथा दिवस असून कुठल्याही प्रशासकीय यंत्रणा व जनप्रतिनिधींनी आंदोलनकारी शेतकरी व
उपोषण ठिकाणी भेट दिली नाही. रोज वैद्यकीय तपासणी करण्यात येते असून, उपोषणकर्ते श्याम पाटील मस्के यांनी प्रशासनाच्या उदासीनतेमुळे औषध घेण्यास नकार दिला आहे. त्यामुळे परिस्थिती चिंताजनक होऊ शकते ,शेतकऱ्यांच्या संयमाला सत्ताधाऱ्यांनी अंत पाहू नये मागण्या मान्य केल्या नाही. आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा रामदास मसराम आंदोलन कार्य शेतकऱ्यांनी दिला आहे.
शेतकऱ्यांच्या मागण्या पुढील प्रमाणे
1. ऊर्जा मंत्रांनी दिलेल्या आश्वासनानुसार कृषी पंपांना दिवसाचा 12 तास वीजपुरवठा करण्यात यावा.
2.शासकीय धान खरेदी केंद्रावर हेक्टरी 50 क्विंटल धान शेतकऱ्याकडून खरेदी करण्यात यावे.
3. आधारभूत धान किंमत 3500 रुपये प्रति क्विंटल करण्यात यावा.
4.ग्रामिण भागातील वीजपुरवठा करणाऱ्या शंकरपुर पाॅवर ट्रांन्सफार्मरवर.
5 एव्हीए ऐवजी 15 एव्हीए ट्रान्सफॉर्मर बसवण्यात यावा.
6. शेतकऱ्यांना शेतीसाठी 24 तास वीज पुरवठा करण्यात यावा
ह्या मागण्या शेतकऱ्यांच्या आहेत
0 Comments