प्रतिनिधी // अनिल कांबडे
ब्रह्मपुरी;- तालुक्यातील बेलगाव देऊळगाव येथील वैनगंगा नदी पात्रातून रात्रीच्या सुमारास अवैद्य उत्खनन सुरू असताना पळापळीच्या नादात कुटुंबातील एकुलता एक मुलाला आपला जीव गमवावा लागला त्यामुळे गावावर व कुटुंबावर शोक कला पसरली आहे बेलगाव येथे घाटावरील रेती चोरीला आळा घालण्याची मागणी यावेळी नागरिकांनी केली सदर परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पोलीस निरीक्षक अनिल जीटावार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रकाश कावळे आत्राम करीत आहेत युवकाचा मृतदेह हा शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय ब्रह्मपुरी येथे आणले युवकाचे नाव गोलू उर्फ प्रणय गुरुदेव धोटे वय वीस वर्षे राहणार देऊळगाव असे आहे मागील वर्षी ब्रह्मपुरी तील काही रेती घाटाचा लिलाव झालेला होता बेलगाव देऊळगाव येथील रेती घाटाचा लिलाव झाला होता मुदतीत रेती साठ्याची विक्री न झाल्याने रेतीसाठा शिल्लक होता एका राजकीय पुढाऱ्याने रेतीसाठ्याची विक्री करण्याचे परवानगी प्राप्त केली ठेकेदाराने नदीपात्रामधून दिनांक 14 मार्च च्या रात्रीच्या सुमारास ट्रॅक्टर नी रेती उपसा करण्याचे काम सुरू केले असल्याचे घटनास्थळी उपस्थित गावकऱ्यांनी सांगितले अशातच अधिकारी येत असल्याची चाहूल लागल्याने घाटावरील दिवाणजी यांनी सर्व ट्रॅक्टर वाल्यांना ट्रॅक्टर लपविण्याकरिता सतर्क केले ट्रॅक्टर हा देऊळगाव येथील तलमले यांच्या मालकीचा असल्याने ट्रॅक्टर वर चालक प्रणय गुरुदेव धोटे यांनी ट्रॅक्टर लपविण्याच्या नादात घाटाच्या जवळ असलेल्या शेतामध्ये जोराने वाहन नेल्याने त्यांचे नियंत्रण सुटले व तो ट्रॅक्टरच्या चाकाखाली येऊन मृत्यू झाला ही घटना पहाटेच्या सुमारास घडली
0 Comments