दिव्यदीप बहुउद्देशीय संस्था ब्रम्हपुरीच्या वतीने मतदार जनजागृती अभियान संपन्न




ब्रम्हपुरी प्रतिनिधी// अनिल कांबळे                    


भारत देशाच्या लोकशाहीची गणना जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाही असणाऱ्या देशांसोबत करण्यात येते.या लोकशाहीत मतदान हे सर्वात महत्त्वपूर्ण तत्त्व आहे.हे मतदान लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 मध्ये मोठ्या प्रमाणत व्हावे यासाठी  मतदारामध्ये जनजागृती व्हावी म्हणून दिव्यदीप बहुउद्देशीय संस्था,ब्रम्हपुरी या NGO च्या वतीने मतदार जनजागृती अभियान स्थानिक बॅरी.राजाभाऊ खोब्रागडे चौक ब्रम्हपुरी  येथे राबविण्यात आला.

       या अभियानाचे उद्घाटन ब्रम्हपुरीचे पोलीस निरीक्षक अनिल जिट्टावार यांनी केले व सदर अभियानास त्यांनी शुभेच्छा दिल्या.या अभियानाच्या निमित्ताने मतदान,लोकशाही,संविधान यांच्या संबंधाने वेगवेगळ्या पोस्टरची प्रदर्शनी भरविण्यात आली होती.प्रत्येकाने मतदान केलेच पाहिजे यासाठी पत्रके वितरीत करून जनजागृती करण्यात आली.

       अनेक लोकांनी या पोस्टर प्रदर्शनीला भेट देऊन स्तुती करत सकारात्मक भाव प्रकट केला.अभियानाच्या निमित्ताने संस्था अध्यक्ष डॉ.स्निग्धा कांबळे यांनी अभियानाला भेट देणाऱ्यांना संविधानाचे,लोकशाहीचे,मतदानाचे महत्व समजावून सांगितले व मतदानाचा हक्क बजावण्यासंबंधी आवाहन केले.

        या अभियानाच्या निमित्ताने संस्था उपाध्यक्ष डॉ.राजेश कांबळे,वैकुंठ टेंभुर्ने,ऍड.आशिष गोंडाने,नरेश राहाटे, संजय बिंजवे,मंगेश नंदेश्वर,लखन साखरे,वसुधा रामटेके,डॉ.ज्योती दुफारे हे संस्था पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments