भाजप सत्तेत आली तर संविधान बदलनार;विरोधीपक्ष नेते वडेट्टीवार




देसाईगंज //14/04/2024 आज तालुक्यातील कोरेगाव येथे लोकसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. नामदेव कीरसान यांच्या प्रचारार्थ  आज महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्षनेते मा. विजयजी वडेट्टीवार हे आपल्या हेलिकॉप्टर ने कोरेगाव येथे उपस्थितीत झाले, आणि त्यासोबत जिल्ह्यातील सर्व नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते हजारोंच्या संख्येने उपस्थित झाले. त्यांनी आपल्या भाषणातून

भाजपा आली  तर  संविधान बदलल्या जाईल  असा  आरोप विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी  कोरेगाव  येथिल  प्रचार सभेत  माध्यमासी बोलतांना आरोप केलाय

सत्ताधारी पक्षावर सडेतोड टीका करत, सत्तेत सहभागी झालेल्या सर्व नेत्यांना धारेवर धरले आणि खूप बॅटिंग केली. या प्रसंगी गडचिरोलीचे काँग्रेस पक्षाचे जिल्हा अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, शिवसेनेचे सुरेंद्र चंदेल, आदिवासी संघटनेचे नंदू नरोटे, जेसा मोटवानी, सावसागडे, राजेंद्र बुल्ले तालुका अध्यक्ष, आणि सर्व महाविकास आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments