भीमनगर येथे झालेल्या नळ योजनेचे काम निकृष्ट लाखो लिटर पाणी जाते वाया,

 

विभागीय संपादक//मारोती कोलावार


सौर ऊर्जेवर आधारित लघु नळ पाणी पुरवठा योजनेतील पाईपलाईन निकृष्ट दर्जाचे; पाईप लिकेजमुळे दिवसाला लाखो लिटर पाणी जातो वाया




गोमणी: ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, जि.प.गडचिरोली. जल जीवन मिशन कार्यक्रम सन-2021-22 मौजा-भिमनगर    ग्रामपंचायत-आंबटपल्ली ता.मूलचेरा जि.गडचिरोली. मौजा-भिमनगर येथे मागील वर्षी(2023) सार्वजनिक विहिरीच्या मदतीने सौर ऊर्जेवर चालणारी मशीन लावून त्याचे घरोघरी पाईपलाईनची जोडणी करण्यात आले परंतु कंत्राटदाराने निकृष्ट दर्जाचे पाईप व इतर साहित्य वापरून पाईपलाईन केल्याने दोन महिन्यातच ते फुटून ठिक-ठिकानाहून दर दिवशी लाखो लिटर पाणी वाया जात आहे.




   जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन समिती,का.अ.(ग्रा.पा.पु.). उपअभियंता(यां).जि.प. गडचिरोली. हायटेक मल्टी सर्व्हिसेस, गडचिरोली मो.नं.9404231689 यांच्यामार्फत हा कार्यक्रम राबविण्यात आलेला असून मागील वर्षी जवळजवळ सहा महिने तांत्रिक बिघाड झाल्याने पाणी पुरवठा बंद होते.कंत्राटदाराला भ्रमणध्वनी द्वारे माहिती दिली असता त्यांनी हेल्पलाईन क्रमांकावर फोन करायला सांगितले,गावकऱ्यांनी वारंवार त्या क्रमांकावर फोन करुन देखील फोन काही लागेना. रोज लाखो लिटर पाणी वाया जात असल्याने विहिरीतील पाण्याची पातळी दिवसेंदिवस खोलवर जात आहे. त्यामुळे गावातील लोकांना पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवत आहे.त्यामुळे या भर उन्हाळ्याच्या दिवसात पाण्यासाठी भटकंती करावी तर लागणार नाही ना?  अशी भीती वाटून गावातील लोकांमध्ये पिण्याच्या पाण्याच्या विषयाला घेऊन चर्चेला भीतीयुक्त उधाण आलेले आहे.



Post a Comment

0 Comments