गडचिरोल्ली जिल्हा प्रतिनिधी// मारोती कोलावार
गोमणी:- पंचशील बौद्ध मंडळ गोमणी/ भीमनगर* यांच्या संयुक्त विद्यमाने महामानव बोधिसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची 133 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी कऱण्यात आली.कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शंकर वंगावार (माजी सरपंच गोमणी)व उद्घाटक म्हणून उमेश कडते सरपंच ग्रामपंचायत आंबटपल्ली हे होते.प्रमुख अतिथी म्हणून अजयभाऊ विरमलवार, बुरे वनरक्षक जामगाव , वाघाडे वनरक्षक मच्छली ,शेंडे सर सेवा निवृत्त मुख्याध्यापक,नागेंद्र दुर्गे,आत्राम पशुवैद्यकीय अधिकारी या मान्यवरांनी स्थान भूषविले.
कार्यक्रमाची सुरुवात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धाकृती पुतड्याचे पूजन करून पुष्पहार व पुष्पमाला अर्पण करून करण्यात आली.कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच गोमणी गावचे नाव रोशन करणाऱ्या रोशनच्या आईवडिलांचे शॉव श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आले.त्यानंतर सेवानिवृत्त मुख्याध्यापक शेंडे सर यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आपल्या शब्दसुमनांनी प्रकाश टाकला.तसेच उमेश कडते यांनी देखील आपल्या संबोधनात डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या "शिका,संघटीत व्हा,आणि संघर्ष करा" हा विचार आपल्या अंगी आत्मसात करून रोशनप्रमाणेच आपल्या आईवडिलांचे व आपल्या गावचे नाव लौकिक करावे असे प्रतिपादन उमेश कडते यांनी आपल्या भाषणात केले.
कार्यक्रमात कोडीगाव येथील शाळकरी मुलींनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या संगीतावर नृत्य करून सर्वांना मंत्रमुग्ध केले.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता गौतम दुर्गे,अजय आरपल्लीवार,योगेंद्र दुर्गे,छगन दुर्गे,अरमान दुर्गे,नकुल माहुलकर,अनुप माहुलकर,संदेश ढुरके, प्रिन्स वनकर,पियुष गोंगले, रुद्रा गोंगले या नवयुवकांनी सहकार्य केले तसेच शुभम शेंडे व अजयभाऊ विरमलवार यांनी विशेष सहकार्य केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन-शुभम शेंडे तर आभार प्रदर्शन राकेश झाडे यांनी केले.
0 Comments