अन् ग्रामपंचायत पदाधिकारीच बनले ठेकेदार पैसे वाचविण्यासाठी निकृष्ट दर्जाची बांधकामे





मुख्य संपादक तथा संचालक// विशाल वाळके

           खबरदार महराष्ट्र न्यूज नेटवर्क


#khabardarmaharashtra#onlinenewsportal#social#education#political#entertainment#crime


तालुक्यातील अनेक गावे समस्याग्रस्त आहेत. परंतु ग्रामपंचायतींचे पदाधिकारी गावातील समस्यांकडे लक्ष देत नसून केवळ ठेकेदारीत व्यस्त असल्याचे विदारक चित्र हल्ली सगळीकडेच दिसून येत आहे. अशातच जिल्ह्यातील बहुतांश गावांमध्ये अशीच परिस्थिती असल्याने तालुक्यातील अनेक गावांत शिक्षण, घर, स्वच्छता, पिण्याचे पाणी, रस्ते, नाल्यांच्या समस्यांकडे दुर्लक्ष झाले आहे.


गावचा सर्वांगीण विकास व्हावा; तसेच गावातील समस्या सोडविण्यात याव्या; हे केवळ प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी यांच्या भरवशावर होऊ शकणार नसल्याने लोकशाही मार्गाने दर पाच वर्षांनी ग्रामपंचायत निवडणूक घेऊन गावातील पदाधिकारी यांची ग्रामपंचायत स्तरावर निवड करण्यात येते. पदाधिकारी निवडून आल्यावर काही पदाधिकारी सोडल्यास इतर हुशार पदाधिकारी केवळ ठेकेदारी वा खिसे कसे गरम होणार; याकडे सर्वात जास्त लक्ष

देण्यात मग्न असतात.



ग्रामपंचायतींचे पदाधिकारी ठेकेदारीत रमले असल्याने बांधकामांवर देखरेखीचा अभाव दिसून येत आहे. त्यातच नियोजनानुसार कामे केली जात नसून पैसे वाचविण्यासाठी निकृष्ट दर्जाची बांधकामे करण्यात येत आहेत. ग्रामपंचायतीचे पदाधिकारीच कंत्राटदार असल्यामुळे 'हम करे सो कायदा' अशी गत झाली आहे. बहुतांश गावांमध्ये सुरू असलेल्या बांधकामांचे कंत्राट ग्रामपंचायत पदाधिकारी स्वतःच घेऊन; दुसऱ्यांची नावे पुढे करून; 'तो मी नव्हेच' अशी भूमिका बजावतांना दिसून येत आहेत. त्यामुळे अशांवर आळा घालणार कोण? असा प्रश्न निर्माण झाला आहे.



बॉक्स


ग्रामपंचायत सक्षम व्हावा या हेतूने शासनाने एक विशिष्ट कायदा अमलात आणून विकास कामे करण्यात प्राधान्य  देऊन स्थानिक स्वराज्य संस्थांना शेड्युल रेटमध्ये कामे दिली जातात. तेच काम जर खुल्या निविदा केले असते तर इतर सर्व कंत्राटदार बिलो जातात. व रक्कम थेट शासनाच्या खात्यात जमा होते. व शासनाला आर्थिक बळ मिळतो. परंतु तसे न होता ग्रामपंचायत पदाधिकारी ठेकेदार बनले आहे. म्हणून शासनाने विशेष अध्ययन करून अशा प्रकरणाला अळा घालावा.






        संतोष ताटिकोंडावार. 

जनकल्यान समज्योन्नती अन्याय भ्रष्टाचार निवारण समितीमहाराष्ट्र.गडचिरोली जिल्हाध्यक्ष




2)बहुतांश सरपंच.उपसरपंच. ग्रामपंचायत सदस्यांचा हेतू हा गावविकासाकडे असायला पाहिजे परंतु हेच पदाधिकारी कंत्राटदार बनून निकृष्ट दर्जाचे कामे करत असतील तर गावांच्या विकासाची जबाबदारी कोणाची गावाकडे लक्षन देता स्वतःचा विकास कशा प्रकारे होईल याच्या कडे अधिकाधिक लक्ष देत आहे कुठे तरी प्रशासनाने यावर आळा घालला पाहिजे....??





              शंकर ढोलगे  

गडचिरोली जिल्हा अध्यक्ष अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती

Post a Comment

0 Comments