एटापल्ली:-तालुक्यातील गेदा- चंदनवेली ही गावे अतिदुर्गम व जंगल व्याप्त गावे आहेत. या गावात विजेची समस्या मोठ्या प्रमाणात असते. यंदाही या गावातील नागरीक विजेच्या समस्येमुळे त्रस्त होत आहेत. वरंवार विजेचा होणारा लपंडाव त्यामुळे जंगलातील हिंस्र प्राणी गावात येण्याची भीती, यामुळे गावातील नागरीकांनी भारतीय कम्युनिस्ट पार्टी शाखा एटापली यांच्याकडे धाव घेऊन आपली व्यथा मांडली. व्यथा ऐकून भारतीय कम्युनिस्ट पार्टी देखील गेदा- चंदनवेली गावातील विजेच्या समस्येबाबत सरसावली.
आणि महावितरण अभियंत्यांना लिहीले पत्र... अन् पत्रात गेदा - चंदनवेली गावाची मांडली व्यथा...!
आम्ही, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे (भाकपा) एटापल्ली शाखा,गेदा आणि चंदनवेली या गावांमध्ये वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याबाबत तक्रार अभियंता, महावितरण कार्यालय, एटापल्ली करण्यासाठी हे पत्र लिहित आहोत.
या गावांमधील रहिवाशांना गेल्या अनेक दिवसांपासून वीजपुरवठा खंडित होत आहे. यामुळे लोकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर, रुग्णांवर आणि दैनंदिन जीवनावर वाईट परिणाम होत आहे.
अनेकदा नागरिकांनी तुमच्या कर्मचार्यांशी वीजपुरवठा खंडित होण्याच्या समस्येबाबत संपर्क साधला आहे, परंतु अद्याप कोणतेही ठोस निराकरण झालेले नाही.
आम्ही आपणास मागणी करतो की,
• वीजपुरवठा खंडित होण्याच्या समस्येचे त्वरित निराकरण करा.
• जुन्या आणि खराब झालेल्या वीजपुरवठा लाइन दुरुस्त करा.
• वीजपुरवठा व्यवस्थेमध्ये सुधारणा करा जेणेकरून भविष्यात अशा प्रकारच्या समस्या उद्भवणार नाहीत.
आम्हाला खात्री आहे की आपण आमच्या तक्रारी गांभीर्याने घ्याल आणि त्वरित योग्य ती कारवाई कराल. सदर निवेदन ,भाकपा एटापल्ली
कॉ. सचिन मोतकुरवार,तालुका सचिव यांच्या नेतृत्वात आले.यावेळी
कॉ.सुरज जककुलवार ,गीता भांडेकर,वनिता सिडाम,धनराज वैरागडे व इतर नागरिक उपस्थित होते.
0 Comments