#khabaardarmaharashtr#onlinenewsportal#social#education#political#entertainment#crime
गडचिरोल्ली;-वनपरिक्षेत्र कसनसुर अंतर्गत कारका ( बु) ते आलेंगा रोड या जंगल परिसरात मोठ्या प्रमाणात अवैध उत्खनन करून रस्त्या बांधकाम करिता जंगलात अवैध उत्खनन झालेले आहे, यास जबाबदार वन परिक्षेत्र अधिकारी, वनपाल, वनरक्षक यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे, अशे सामाजिक कार्यकर्ते योगाजी कुडवे यांची आपल्या निवेदनात म्हटले आहे अन्यथा दिनांक.06/06/2024 पासुन मुख्य वन संरक्षक कार्यालय गडचिरोली समोर बेमुदत आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे सदर निवेदनात अशे म्हटले की
कसनसुर वन परिक्षेत्र कार्यालयं अंतर्गत येत असलेल्या कारका ( बु) ते आलेंगा या रस्ता बांधकाम करिता रस्ता तयार करताना कंत्राटदार यांनी जंगलातील अवैध मुरुम माती हे रस्त्यावर टाकले आहे, अनेक झाडांची कत्तल करण्यात आली आहे, जवळ्पास यां रस्ता बांधकाम करिता हजारों ब्रास अवैध उत्खनन करून मुरुम रस्त्यावर टाकले आहे, तसेच रस्त्यांच्या दोन्हीं साईड ला उत्खनन करण्यात आले आहे.त्यामुळें सागवान झाडांना धोका निर्माण झाला आहे, ते संपुर्ण सागवन झाले, पावसात पडल्या शिवाय राहणार नाही, कारण त्या झाडांच्या दोन्हीं साईड ला उत्खनन केले आहे,वन संपत्ती नष्ट करण्यात आली, वन परिक्षेत्र कार्यालयं अंतर्गत येत असलेल्या अधिकाऱ्यांनी जाणीव पूर्वक दुर्लक्ष केले असल्याचे दिसून येते, त्यामुळें या सर्व जबाबदार वन परिक्षेत्र अधिकारी, वनपाल,वनरक्षक यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे,
कारका गावाला लागून तलावात अंदाजे 2 हजार ब्रास मुरूमाचे अवैध उत्खनन केले आहे, तसेच कारका गावाकडून कसनसूर मेन रोड कडे येतांना उजव्या बाजूला सागवान प्लांट ला लागून दोन ठिकाणीं अंदाजे 1000 ब्रास माती मुरूम उत्खनन करून रस्तावर टाकले आहे.त्यामुळें महसूल विभागाच्या रेट नुसार 5 पट दंड आकारून संबंधित कंत्राटदार यांचे कडून तात्काळ रक्कम वसूल करण्यात यावे, यापूर्वी दोन वेळा निवेदन सादर करण्यात आले परंतू वन विभाग दुर्लक्ष करीत असल्याने मुख्य वनसंरक्षक कार्यालय गडचिरोली समोर दिनांक.06/06/2024 पासुन बेमुदत ठिय्या आंदोलन करण्यात येईल, याची संपुर्ण जबाबदारी वन विभागाची राहिल.अशे निवेदनात म्हटले आहे
0 Comments