एटापल्ली;- आदिवासी विकास महामंडळाद्वारे खरेदी केलेल्या धानाची तातडीने उचल करण्यासाठी भारतीय कम्युनिष्ठ पक्षाचे विधानसभा अध्यक्ष कॉम्रेड सचिन मोतकूरवार यांनी प्रादेशिक व्यवस्थापक गडचिरोल्ली यांना निवेदनातून मागणी केली आहे
सदर निवेदनात मोतकूरवार यांनी अशे म्हटले आहे की गेल्या काही महिन्यांपासून आदिवासी विकास महामंडळाने मोठ्या प्रमाणावर धान खरेदी केली आहे हे धान अनेक गोडाऊन आणि उघड्या जागेवर ठेवलेली आहे आणि या धान्याला पाण्यापासून आणि इतर नैसर्गिक आपत्तीपासून बचाव करण्याची तातडीची आवश्यकता आहे जर हे धान पावसाळ्यात उघड्यावर राहिले तर खराब होण्याचा धोका आहे त्यामुळे मोठे आर्थिक नुकसान होईल याव्यतिरिक्त पावसाळ्यात धान उचलणे कठीण आणि खर्चिक होईल या अनुषंगाने सर्व गोडाऊन आणि उघड्या जागेवर साठवून ठेवलेल्या धानाची त्वरित पाहणी करा, खराब झालेले किव्हा नुकसान झालेले धान तातडीने वेगडे करा आणि योग्यरीत्या व्हिलेवाट लावा, उर्वरित धान सुरक्षित आणि कोरड्या ठिकाणी हलवा या करिता निवेदन सादर केले आहे
0 Comments