आंबटपल्ली:- ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या गावांतील तेंदुपत्ता जाहीर लिलाव यंदा करण्यात आले नाही. याचाच फायदा घेत चिचेला,आंबटपल्ली, आंबटपल्ली टोला, येरमे टोला, कोडीगावं, कोडीगावं टोला येथी ग्रामकोष समिती अध्यक्षांनी कंत्राटदारासोबत संगनमत करून २८ नोव्हेंबर २०२३ला गडचिरोली येथे जाऊन मे. जोत्सना मोटर्स सावलीच्या नावाने गुप्तमार्गाने पैसे घेऊन करारनामा केले, मात्र याची भनकही जनतेला लागु दिले नाही.
मे महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात तेंदुपत्ता संकलनाला सुरवात झाली. आणि अवकाळी पावसामुळे एक दिवसा आळ, दोन दिवसा आळ, असे करून एकूण तीन दिवस तेंदुपत्ता संकलन करून टेंडर भरण्या अगोदरच बंद करण्यात आले. एकंदरीत दहा दिवसाऐवजी तीनच दिवस मजुरी मिळाली.
आजच्या घडीला तेंदुपत्ता संकलन बंद होऊन जवळ जवळ दहा ते पंधरा दिवसांचा काळ लोटूनही अद्याप मजुरांची मजुरी मिळालेली नाही आणि यंदाची मजुरी मिळेल की नाही? ग्रामकोष समिती अध्यक्षांचा मजुरी न मिळण्यामागे काही गेम प्लॅन तर नाही ना? असा संभ्रम निमार्ण होत आहे.
विशेष म्हणजे सामाजिक कार्यकर्ते शुभम शेंडे,हरिचंद्र मराठे व उमेश कळते सरपंच ग्रामपंचायत आंबटपल्ली,यांनी सदर आंबटपल्ली ग्रामपंचायती मधील तेंदूपत्ता करारनामा हा अवैध आहे हे लक्षात आणून दिल्या नंतरही काही ग्रामकोष अध्यक्षांनी संबंधित कंत्राटदाराची बाजू घेत तेंदूपत्ता तोडणीचे पैशे कंत्राटदार न दिल्यास आम्ही देतो या पद्धतीत बोलणी केली. जर का तेंदूपत्ता कंत्राटदाराने हात वर केल्यास नागरिकांचा तेंदूपत्ता तोडणीचा पैसा सदर कंत्राटदारांची बाजू घेतलेले ग्रामकोष अध्यक्ष देतील का हा प्रश्न नागरिकांना पडला आहे.
तेंदुपत्ता संकलन बंद होऊन पंधरा दिसानंतरही मजुरांची मजुरी मिळेना?आंबटपल्ली ग्रामपंचायत मध्ये चाललं तरी काय? या विषयाला घेऊन नागरीकांमध्ये चर्चेला उधान आले आहे. आर्णि रोषही व्यक्त केला जात आहे. मजुरी मिळेल कि नाही याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे,
0 Comments