फसवणुक करून करारनाम्यावर घेतली माझी स्वाक्षरी; ग्रामकोष समिती अध्यक्षाने दिली कबुली




आंबटपल्ली: त्या ग्रामकोष समिती अध्यक्षांवर गुन्हा दाखल करू, असे ग्रा.पं. आंबटपल्ली चे सरपंच उमेश कडते यांनी प्रसिद्धी पत्रकात प्रसिद्ध करताच खबरदार महाराष्ट्र न्युज नेटवर्क ने ही बातमी प्रसारित करताच त्या ग्रामकोष समिती अध्यक्षांचे धाबे दणानले आहेत. त्या अध्यक्षांपैकीच एका अध्यक्षाने तर चक्क बाजी पलटवत फसवणुक करून करारनाम्यावर माझी स्वाक्षरी घेतले असल्याचे कबुल केले आहे.

    संबंधीत अध्यक्षाने असे कबुल केले की, जिल्हाधिकारी कार्यालयात मिट्टिंग आहे म्हणून मला गडचिरोली येथे चारचाकी गाडीने घेऊन गेले अन् एका हॉटेलमध्ये नेऊन बसवुन ठेवले. एक तास झाले, दोन तास झाले, असे करता करता तीन तास झाले तर मी विचारात पडलो की जिल्हाधिकारी कार्यालयात जर मिटिंग असले तर इतका वेळ लागत नाही आणि असे बाहेर हॉटेलमध्ये बसुन राहण्याची काहीच गरज नाही म्हणून मला जरा माझ्यासोबत असलेल्या



 ग्रामकोष समिती अध्यक्षांवर संशय आला. मी त्यांना न राहवता विचारले की जिल्हाधिकारी कार्यालयात मिटींग असेल तर आपण तिथेच जाऊ चला व जिल्हाधिकारी कार्यालयात मिटींग असल्यास इतका उशीर का बरं होत आहे, असे विचारले असता हो थोड़ा वेळ थांब असे म्हणुन मला गप्प बसायला सांगत होते.

  तीन तासानंतर स्टॅम्प पेपर घेऊन आले आणि त्यांनी सर्वजण सह्या केल्यानंतर मला पण सही करण्यास सांगितले परंतु मी सही न करता त्यांना विचारले की हे काय आहे तर त्यांनी तेव्हा मला सांगितले की हा तेंदुपत्ता करारनामा आहे म्हणुन तर मी सही करण्यास नकार दिला तर त्या सर्वांनी जबरदस्ती करू लागले की आम्ही सर्वांनी सह्या केलेल्या आहेत. तुला सही करायला काय होत आहे. तु जर सही केली नाही तर आपण आलेल्या गाडीचा खर्च, या हॉटेलमध्ये नास्ता, चाय व इतर झालेला सर्व खर्च आपल्यालाच भरून द्यावा लागेल आणि त्याचे पैसे आपल्याकडे नाही आहेत. तु फक्त  सही कर आणि हे दहा हजार रुपये घे व चुपचाप रहायचं बाकीच आम्ही करु जे करायचे ते असे म्हणुन जबरदस्ती करू लागले असता नाईलाजास्तव मी दहा हजार रुपये घेऊन सही केली आहे.

        खबरदार महाराष्ट्र न्युज नेटवर्क'चा दणका बसताच एक-एक ग्रामकोष समिती अध्यक्ष कबुली द्यायला सुरवात केली आहे.

Post a Comment

0 Comments