अहेरी;-महसूल कर्मचारी (तलाठी) यांनी कंत्राटदारांकडून अवैध रित्या रक्कम घेतल्या बाबत.
त्या तीनही महसूल कर्मचाऱ्यांना 20 जून पर्यंत निलंबित करा अन्यथा येत्या 25 जून ला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुद्दत ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा.
अखिल भारतीय भ्रष्टाचार संघर्ष निर्मूलन समिती गडचिरोल्ली जिल्हाध्यक्ष शंकर ढोलगे यांनी प्रसिद्धी पत्रकातून दिला आहे
वृत्त अशे की फैजाण युसूफ खान हे आपले डांबर प्लांट महागाव खुर्द येथे उभारत असतांना फैजान शेख यांनी डांबर प्लांटच्या बाजूलाच एमआरजीएस योजने अंतर्गत विहीर खोदकाम करतांना मुरूम टाकत असतांना व्यंकटेश जल्लेवार नामक तलाठी यांनी विचारांनी केली.
की या मुरूमची रायल्टी आहे काय या वेळेस फैजाण शेख यांनी बाजूला विहीर खोद काम करत आहे अश्या प्रकारे उत्तर दिल्या नंतर तलाठी जेल्लेवार यांनी रायल्टी काढायची काही आवश्यकता नाही मला दहा हजार रुपये द्या तुमचं काम चालू ठेवा अश्या पद्धतीने उत्तर दिल्या नंतर भीती पोटी फैजाण शेख यांनी आपल्या फोन पे नी दहा हजार रुपये मारले
सदर काम चालू असतांना दुसऱ्या दिवशी सचिन मडावी चिंचुगुंडी येथील तलाठी व रवी मेश्राम कोडसेपल्ली येथील तलाठी यांनी फैजान शेख यांना धमकावून तहसीलदारांनी आम्हाला पाठविले एक लाख रुपये द्या नाही तर.
तुमच्या गाड्या आम्ही अंदर लावते या ही भीती पोठी शेख यांनी नगदी ५० हजार व फोनपे ने ५० हजार मारले व आपल्यावर अन्याय झाले समजून ही बाब सामाजिक कार्यकर्ते शंकर ढोलगे यांना कळवली व मला न्याय मिळवून द्या ही गुहार लावली.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन शंकर ढोलगे यांनी उप विभागीय अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी आदित्य जीवने यांना तक्रार दिली असून कंत्राटदार सरेंडर होऊनही अजूनही कारवाही न झाल्याने
शंकर ढोलगे गडचिरोली जिल्हा अध्यक्ष अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर येत्या 25 जून ला बेमुद्दत ठिया आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे
0 Comments