गोमनी;-वीज वितरण कंपनी नेहमी वादाच्या भोवऱ्यात असते याला दुमत नाही परंतु चक्क ग्रामपंचायत गोमनी सदस्य शुभम शेंडे यांनी वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनो जागे व्हा अन्यथा तुम्हाला संविधानिक मार्गाने आंदोलन करून जागे करू व येत्या 9 जुलै ला आंबेडकर चौक गोमनी येथे रस्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा दिला
सविस्तर अशे महावितरणकडून विद्युत ग्राहकांना चोविस तास वीज उपलब्ध व्हावी,अशी नागरिकांना अपेक्षा असते.परंतु गोमनी परिसरात वेळीअवेळी वीज पुरवठा खंडीत हाेत असल्याने वीज ग्राहकांचा मागील पंधरा दिवसांपासून अपेक्षाभंग होत आहे. मात्र याकडे महावितरणच्या अधिकाऱ्यांचे व कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे, तर दुसरीकडे वीज बिलाची मात्र सुलतानी वसुली सुरू असल्याचे बोलल्या जात आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत.गोमनी परिसरात जंगलव्याप्त गावेआहे, विजेचा असा खेळखंडोबा सुरू राहिला तर नागरिकांना त्रास सहन करावा लागणार आहे.एखाद्या वेळी वीज पुरवठा खंडित झाल्यानंतर परिसरात अनुचित घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. गोमनी परिसर हा जास्तीत जास्त भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) सेवेवर अवलंबून आहे व भारत संचार निगम लिमिटेड ही लाईनच्या भरवश्यावर आहे इकडे लाईन गेली की काही सेकंदातच नेटवर्क जातो या खोळंब्यामुळे कार्यालयीन कामे तर माणूसही ठप्प पडतो या संपूर्ण बाबी विषयी खबरदार महाराष्ट्र न्यूज नेटवर्क ने अनेक बातम्या प्रकाशित केल्या या बातमीला अनुसरून ग्रामपंचायत गोमनी सदस्य शुभम शेंडे यांनी उचलून धरले व येत्या 9 जुलैला डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकात रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे
व या आंदोलनाची सर्वस्व जवाबदारी महावितरण कंपनी ची राहील असे म्हटले आहे
प्रमुख मागण्या
१) गोमनी फिडर मोठा असल्या कारणाने जवळपास सबस्टेशन द्यावे
२) पावसाळ्यात २४ तास गोमनी परिसरातील गावात वीज उपलब्द व्हावी
३) गोमनी परिसरात वीज वितरण कर्मचाऱ्यांची वाढ करावी
४) भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) सेवा ही विजेच्या भरवश्यावर न ठेवता स्वतंत्र जनरेटरची व्यवस्था करावी
0 Comments