#khabrdarmaharashtr#onlinenewsportal#education#political#entertainment#crime
गडचिरोल्ली;- जिल्ह्यातील एटापल्ली तालुका हा वनसंपदा असलेला तालुका आहे.या तालुक्यात अनेक विकासकामे सुरू आहेत. विकासकामे करतांना कंत्राटदार त्याला लागत असलेलाअवैध मुरुम,माती,गिट्टी ही वनपरिक्षेत्रातून उत्खनन करून वाहतूक करुन कामासाठी वापरले जातात.यामध्ये त्या वनपरिक्षेत्रातील अधिकारी व कर्मचारी यांच्या संगनमताने हे काम केले जाते. मेंढरी-गर्देवाडा रा.मा. या कामासाठी कंत्राटदाराने खूप मोठ्या प्रमाणात मुरूम,गिट्टी अवैधरीत्या उत्खनन केले आहे.तसेच रेक्कलमट्टा ते रेंगाटोला या रस्ता बांधकामा दरम्यान सुद्धा गट्टा व एटापल्ली वनपरिक्षेत्रातून खूप मोठ्याप्रमाणात अवैध प्रमाणात मुरूम उत्खनन केला गेला आहे याबाबत श्रीकृष्णा वाघाडे यांनी मागील ३ महिन्यापासून तक्रार करूनसुद्धा यावर काहीही कार्यवाही करण्यात आली नाही त्यामुळे आजपासून मुख्य वनसंरक्षक(प्रादे.) कार्यालय गडचिरोलीसमोर बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.
जेव्हा पर्यंत वनपरीक्षेत्र अधिकारी, क्षेत्र सहाय्यक, वनरक्षक यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे व कंत्राटदारावर कार्यवाही करण्यात येत नाही तेव्हा पर्यंत सदर बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू राहील.
सदर ठिय्या आंदोलनास श्रीकृष्णा वाघाडे,रविंद्र सेलोटे बसलेले आहेत.
0 Comments