विभागीय संपादक//मारोती कोलावार
गोमणी:- मुलचेरा तालुक्यातील मौजा - गोमणी येथील भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) सेवा मागील ४ दिवसांपासुन विस्कळीत झाली आहे. गोमणी परिसरातील १० ते १५ गावे या BSNL टॉवरच्या नेटवर्क मध्ये येतात आणि याच टॉवरचे नेटवर्क हे महावितरणाच्या वीजेवर अवलंबुन आहे. गोमणी परिसरातील वीजही सरासरी अर्ध्या तासात दोनदा जात असते. आणि वीज गेल्यानंतर जवळ जवळ १० ते १५ मि. येत नाही. जशी वीज पुरवठा बंद तशी एका सेकंदाच्या आत नेटवर्क देखील बंद होतो. त्यामुळे या परिसरातील कार्यालयीन कामे व इतर व्ययक्तिक कामे देखील ऑनलाईन पद्धतीने चालतात.या भागातील वीज पुरवठा वारंवार खंडीत होत असल्याने BSNL नेटवर्क देखील खंडीत होतो. त्यामुळे सर्व ऑनलाईन कामे टप्प पडतात.
शेतकऱ्यांची ऑनलाईन कामे, शाळकरी मुलांची शालेय कामे, ग्रामपंचायतमधील ऑनलाईन दाखले व ऑनलाईन कामे तसेच इतर कामे जी ऑनलाईन पद्धतीने केल्या जातात, त्यासर्वच कामावर मोठ्या प्रमाणात परिणाम होत आहे.
एकाच कामाकरिता वारंवार कार्यालयाच्या चक्रा माराव्या लागत आहेत. त्यातल्या त्यात नेटवर्क असतांना नेट चा स्पीड कमी असल्याने सुद्धा ऑनलाईन कामावर परिणाम होत आहे.
गोमणी येथील BSNL टॉवरला वीजेच्या भरवश्यावर न ठेवता जनरेटची सुविधा करून नेटवर्क सेवा सुरळीत करून BSNL ग्राहकांची पिळवणून दुर करावे,अशी मागणी गोमणी परिसरातील BSNL ग्राहकांकडून होत आहे.
0 Comments