एससी/ एसटी संघर्ष समिती कडुन सर्वोच्च न्यायालयाचा निषेध
ब्रह्मपुरी प्रतिनिधी अनिल कांबळे
अनु. जाती / जमाती आरक्षण उपवर्गीकरण व क्रिमीलेयर बाबतीत मा सर्वोच्च न्यायालयाने जो निकाल 1 ऑगस्ट 2024 ला दिला तो पुर्णपणे चुकीचा असुन त्या विरोधात सर्व एससी/ एसटी घटकातील समुदाय नाराज झालेला आहे. या निकालाचे स्वागत कर्नाटक व तेलंगाणा च्या काँग्रेस सरकारने केले. तसेच न्यायालयाच्या खांद्यावर बंदुक ठेऊन भाजपा सरकारने छुपे राजकारण केले. या दोन्ही सरकारांच्या व सर्वोच्च न्यालयालयाच्या निकालाच्या विरोधात 21 ऑगस्ट भारत बंदच्या समर्थनार्थ आज दिनांक 21 ऑगस्ट ला एससी / एसटी संघर्ष समितीने संपुर्ण ब्रम्हपुरी कडकडीत बंद करुन, बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे चौक येथुन मोर्चाच्या स्वरुपात बंद मध्ये हजारोंच्या संख्येने सामील होऊन उपविभागीय अधिकारी मार्फत राष्ट्रपती, केंद्रसरकार, तथा राज्यसरकार यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर केले तसेच मागण्यांची पुर्तता न झाल्यास उग्र स्वरूपाचे आंदोलनाचा ईशारा सुद्धा देण्यात आला.
त्यानंतर आंबेडकर चौक येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्याला अभिवादन करुन सर्व सामाजिक, धार्मिक, राजकीय व आंबेडकरी तथा आदिवासी चळवळीतील काम करणाऱ्या प्रमुख वक्त्यांच्या मनोगतातून उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले. मार्गदर्शन करतांना डॉ प्रेमलाल मेश्राम, अशोक रामटेके, संतोष रामटेके, गोपाल मेंढे, केशिप पाटील, लिलाधर वंजारी, रोशन मेंढे, खेमचंद नंदेश्वर, प्रभु bलोखंडे,धनपाल वंजारी, किरण मेश्राम, सुकेशनी बन्सोड हे मान्यवर उपस्थित होते तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डी एम रामटेके, डेनी शेंडे, नरेंद्र मेश्राम, राजु मेश्राम, रतन लांडगे, अनंता मेश्राम, कमलेश मेश्राम, नागेश चहांदे, अखिल कांबळे, ललित धोंगडे, अनिल कांबळे, वंदना कांबळे योगिता रामटेके प्रतिभा डांगे प्रमिला पाटील तसेच ब्रह्मपुरी तालुक्यातील ग्रामीण भागातील स्त्रिया नवयुवक मोठ्या संख्येने हजर होते यांनी मोलाचे सहकार्य केले. यावेळी शेकडो एससी/ एसटी समाजातील आरक्षणवादी विचारांचा जनसमुदाय उपस्थित होता.
0 Comments