26 वर्षीय तरुणीचा संशयास्पद स्थितीत आढळला मृत्युदेह .




तालुका प्रतिनिधी// अंकुश पुरी


#khabardarmaharashtra#onlinenewsportal#social#education#political#entertainment#crime#murder#


कुरखेडा जिल्हा परिषद शाळेजवळील घटना.    


 दि.24/08/2024 रोजी शनिवारला कुरखेडा जिल्हा परिषद कन्या शाळेच्या  संरक्षक भिंती जवळ आज सकाडला 7 वाजेच्या सुमारास एका 26 वर्षीय युवतीचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली .ज्योती उर्फ चांदणी मसाजी मेश्राम असे मृत युवतीचा नाव आहे..


माहितीनुसार जिल्हा परिषद शाळेच्या आवारात क्रिकेट खेळण्यासाठी गेलेल्या मुलांना संरक्षण भिंतीला लागून युवतीचा मृतदेह दिसला याची माहिती पूर्ण शहरात वाऱ्यासारखी परसली ..

घटनास्थळावर गर्दी उसळली ,

सदर घटनेची माहिती मिळताच येथील उपविभागीय पोलिस अधिकारी रवींद्र भोसले व पोलीस स्टेशन चे ठाणेदार महेंद्र वाघ यांनी पोलीस ताफ्यासह घटना स्थळाकडे धाव घेतली..


घटनास्थळाचा पंचनामा करून मृत्यदेह ताब्यात घेउन कुरखेडा उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आला,प्राथमिक तपासात युवतीचा मृत्यू नेमका  कसा झालं  हे सांगता येत नसल्याचे मत वैद्यकीय अधिकारी यांनी व्यक्त केले.

मृत्यू चे नेमके कारण पि एम नंतर स्पट होईल..

Post a Comment

0 Comments