राहुल दोंतुलवार //देवलमरी ग्रामीण प्रतिनिधी
अहेरी - कृषि विभाग, कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) व उमेद, अहेरी यांचे सयुंक्त विद्यमाने जंगलातील तसेच शेतशिवारातील नैसर्गिकरीत्या उगवल्या जाणाऱ्या पालेभाज्या, कंद, रानफळ या रानभाज्यांचे माहिती व आरोग्य विषयक महत्त्व सर्वसामान्य नागरिका पर्यंत पोहोचावे याकरीता शनिवारी अहेरी येथे तालुकास्तरीय रानभाजी महोत्सव साजरा करण्यात आला.*
या महोत्सवाचे उद्घाटन नायब तहसीलदार तथा मुख्याधिकारी नगर पंचायत अहेरी नानाजी दाते यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सूचित लाकड़े विषय विशेषज्ञ कृषि विज्ञान केंद्र, गडचिरोली, संदेश खरात तालुका कृषि अधिकारी, अहेरी, लक्ष्मण कन्नाके, उमेदचे सतीश उमरे,चांगोराव गंगातीरे, वंदना कोडापे तसेच शेतकरी उत्पादक कंपनीचे संचालक, शेतकरी गटातील सभासद उपस्थित होते.
नैसर्गिकरीत्या जंगलात तसेच शेतामध्ये उगवलेल्या विषमुक्त रानभाज्या व पालेभाज्या आरोग्यसाठी लाभदायक असून याचा समावेश नागरिकांनी रोजच्या आहारामध्ये करावा असे प्रतिपादन नायब तहसीलदार नानाजी दाते यांनी यावेळी केले. कृषि विज्ञान केंद्र, गडचिरोलीचे विषय विशेषज्ञ सूचित लाकड़े यांनी रानभाजी व रानफळाचे वैशिष्ट त्यांचे पौष्टीक गुणधर्म व आरोग्यवर्धक फायदे,संवर्धन, रानभाजी पाककृती याबाबत उपस्थिताना सविस्तर माहीती दिली. तालुका कृषि अधिकारी संदेश खरात यांनी महोत्सवाचे महत्त्व सांगत नैसर्गिक पद्धतीने मिळत असलेल्या रानभाज्या याचे योग्य संवर्धन करण्याचे आवाहण यावेळी शेतकऱ्याना केले.वंदना कोडापे यांनी शेतकरी उत्पादक कंपनी तसेच गटामार्फत जंगलातील रानभाज्या शहरी भागापर्यंत विक्रीसाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते जिल्हास्तरावरून प्रकाशित करण्यात आलेल्या रानभाज्यांची माहीती पुस्तिकेच वितरण शेतकऱ्याना करण्यात आले. महोत्सवास एकूण 26 गटांनी विविध प्रकारच्या रानभाज्या प्रदर्शनी व विक्रीसाठी ठेवल्या होत्या. याकरीता महोत्सवात सहभाग घेतलेल्या गटांना मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तिपत्र देऊन गौरविण्यात आले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तंत्रज्ञान व्यवस्थापक समीर पेदापल्लीवार यांनी केले तर आभार तालुका अभियान व्यवस्थापाक सतीश उमरे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी तालुका कृषि अधिकारी कार्यालयातील सर्व कृषि पर्यवेक्षक, कृषि सहाय्यक अधिकारी, कर्मचारी तसेच उमेदच्या कर्मचाऱ्यानी सहकार्य केले.
0 Comments