देसाईगंज तालुका प्रतिनिधी// अंकुश पुरी
गडचिरोली;- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे हे २१ ऑगष्ट ते २६ ऑगष्ट दरम्यान विदर्भाच्या दौऱ्यावर असतांना ते २२ ऑगस्ट ला गडचिरोली येथे येत असून सकाळी १० वाजता गडचिरोली येथील कॉम्प्लेक्स परिसरातील सर्किट हाऊस येथे आपल्या पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक घेणार आहेत.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांचा संपुर्ण महाराष्ट्र दौरा सुरू सुरू असताना ते गडचिरोलीमध्ये आपल्या पक्षाचा विधानसभेच्या निवडणुकीकरिता उमेदवार घोषित करणार का याकडे गडचिरोलीवासी यांचे लक्ष लागलेले आहे.
गडचिरोली येथील काही प्रमुख पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते राज ठाकरे यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत पक्ष प्रवेश सुद्धा करणार आहेत.

0 Comments