वैरागड येथील सर्पमित्रांनी दिले ८ फूट अजगर सापाला जीवनदान





वैरागड:-येथील सती मोहल्यातील आत्राम यांच्या घरी रात्रीच्या काळोखात निघालेल्या महाकाय अजगर सापाला सर्पमित्राच्या प्रयत्नाने  जीवनदान दिल्याची घटना घडली आहे.

       पाहताच अंगावर काटे उभे  करणारा जगात महाकाय म्हणून समजणारा ८ फूट लांबीचा अजगर (ग्रामीण भाषेत चिट्टी) सापास येथील अरमोरी वृक्षवल्ली वन्यजीव संरक्षण संस्थेचे सदस्य सर्पमित्र प्रलय सहारे आणि प्रवज्जा प्रलय सहारे यांनी जीवनदान दिल्याची घटना दि. २४ ऑगस्टच्या मध्यरात्री १.३० वाजताच्या दरम्यान घडली. 

येथील सती मोहल्ल्यात रहिवासी असलेले ग्रामपंचायत सदस्य सत्यदास आत्राम यांच्या राहत्या घरी पाळलेल्या कोंबड्या खाण्यासाठी घरात मध्यरात्री महाकाय सापाने प्रवेश केला. शिट्टीचा आवाज, कोंबड्याचे ओरडणे आणि फळफळण्याच्या आवाजाने आत्राम  परिवार जागे झाले. कोंबड्या आणि सरपन (काड्या) ठेवणाऱ्या खोलीत महाकाय साप कोंबड्यांचे भक्ष करीत असल्याचे आढळले. सापाला पाहताच आत्राम परिवाराने एकच बोंबाबोंब केली. काहीतरी विचित्र प्रकार घडला म्हणून सगळे मोहल्ल्यातील परिवार त्यांच्या घराकडे धाव घेतली असता भयानक अवाढव्य साप दिसला. याबाबत काही लोकांनी त्याचवेळी सर्पमित्र प्रलय सहारे यांच्या घरी येऊन साप असल्याची माहिती दिली. सर्पमित्राने वेळ न घालवता तत्काळ सर्पमैत्रीन प्रवज्जा सहारे हिला घेऊन आत्राम यांच्या घरी गेले असता खोलीत काड्या  ठेवलेल्या ठिकाणी सुस्त अवस्थेत गुंडाळी मारलेला अजगर सापाची ओळख पटवून घेतली. अजगर सापाने आत्राम यांच्या २ कोंबड्या आणि ७ अंडे फस्त केले होते. साप लांब आणि अवाढव्य असल्याने तेथील असलेले काड्या आणि इतर सामान नागरिकांच्या मदतीने मोकळे केले. अथक प्रयत्नानंतर सर्पमित्रांनी त्या सापास अलगद पकडून वनविभाग आणि वृक्षवल्ली वन्यजीव संरक्षण संस्था आरमोरी यांना माहिती देऊन त्याच्या वन अधिवासात सोडण्यात आले.  

         खास करून गडचिरोली जिल्ह्यामध्ये एकमेव सर्पमैत्रिन म्हणून प्रवज्जा प्रलय सहारे ह्या कार्यरत आहेत  त्यांनी हा साप पकडताना महत्त्वाची भुमिका बजावली आहे हा साप पकडून आपली खास ओळख निर्माण केली आहे.हा

साप पकडाताच भीतीच्या वातावरणात वावरणाऱ्या आत्राम परिवार आणि परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला. साप पकडतांनी सर्पमित्रास प्रकाश दाने, नकुल सोनबावणे, नितेश सोनबावणे, महेश सोनबावणे, नितेश गेडाम, अविनाश कुलासंगे, तन्मय पेंदाम, योगेश गेडाम तर साप सोडतांना पितांबर लांजेवार, कादर बांबोळे, कोविद खरवडे, धर्मराज बावनकर, आश्विन लांजिकार तसेच काही गावातील नागरीक उपस्थित होते. साप पाकडताच संपूर्ण गावातील आणि परिसरातील नागरिकांनी साप पाहण्यास एकच गर्दी केली व सर्पमित्रांचे कौतुक करण्यात आले.

Post a Comment

0 Comments