प्रतिनिधी//राहुल दोंतुलवार
अहेरी;-जमीन फेरफार करून सातबाऱ्यावर नावे लावण्यासाठी 9हजार रुपयाचा लाचेची मागणी करून 6000हजार रुपये स्विकारणाऱ्या मंडळधिकारी व तलाट्यास 2ऑगस्ट ला जेरबंध केले ही कारवाही महागाव ता अहेरी येथे केली.
खमनचेरू येथील मंडळ अधिकारी भूषण रामभाऊ जावंजाडकर (38)वर्ग 3 व व्यंकटेश सांबय्या जल्लेवार (40)वर्ग 3 यांचा आरोपी मध्ये समावेश आहे. महागाव येथील एक शेतकऱ्याचा जमीन फेरफार करून सातबारा वर तीन नावे लावायची होती त्यासाठी तलाठी व्यंकटेश जल्लेवार याने प्रत्येकी 3हजार रुपया प्रमाणे तीन नावे लावण्यासाठी 9हजार रुपयांची मागणी केली. तडजोडीनंतर 6हजार रुपये स्वीकारण्यास मान्य केला. शेतकऱ्याने लाचलूचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानंतर लाचमागणी पडताडणी करून 2ऑगस्ट ला सापळा लावला. जल्लेवार याने तक्रारदाराकडून सहा हजार रुपये स्वीकारतानाच पथकाने त्यास पकडले त्यानंतर मंडळधिकारी भूषण जावंजाडकर यालाही ताब्यात घेतले ए सी बी चे उपअधीक्षक चंद्रशेखर ढोले. पो नि शिवाजी राठोड सहाय्यक फौजदार सुनील पेड्डीवार. शंकर डांगे. किशोर जाऊजरकार. प्रवीण जुमनाके यांनी कारवाही केली.
0 Comments