गडचिरोल्ली;-आज दिनांक 2 ऑगस्ट 2024 रोजी प्रणयभाऊ खुणे यांच्या नेतृत्वाखाली मुख्य वनसंरक्षकांना निवेदन देण्यात आले
निवेदनात अशे म्हटले आहे की विकासकामामध्ये कर्मचाऱ्यांना निलंबन करणे म्हणजे कर्मचाऱ्यांचे मानसिक संतुलन खचिकरंन करणे होय
जर का त्या वनकर्मचाऱ्याचे निलंबन रद्द न केल्यास राष्ट्रीय मानवाधिकार संघटना तर्फे मुख्य वनसंरक्षक कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा थेट इशारा दिला
सविस्तर या प्रमाणे की वनविभाग भामरागड अंतर्गत वनपरिक्षेत्र कसनसूर येथील कर्मचाऱ्यााना रस्ता बांधकामामध्ये रस्त्याच्या कडेला ठेकेदार द्वारे नाली खोदकाम केल्यामुळे काही वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले. सदर कामाचे वनगुन्हा दाखल करण्यात आले होते. संपूर्ण महाराष्ट्रात एटापल्ली तालुका हा नक्षलग्रस्त व अतिदुर्गम म्हणून ओळखला जातो. देश स्वतंत्र होऊन सुद्धा गावाला जाण्याकरिता रस्ते नाही. सदर गावे हे मुलभूत सोयी-सुविधेपासून वंचित आहेत. रस्त्याच्या विकासकामाकरिता कर्मचाऱ्याचे निलंबन करणे हि कारवाही योग्य नाही. सदर कारवाही हि मानवाधिकार चे हनन आहे. जर विकासकामामध्ये कर्मचाऱ्याना निलंबन करणे म्हणजे कर्मचाऱ्याचे मानसिक संतुलन खचीकरण करणे होय. या वन कर्मचाऱ्यांना पूर्ववत नोकरीमध्ये सामावून घेण्यात यावा.
गडचिरोली जिल्ह्यात सुरजागडमध्ये मोठ्या प्रमाणात कामे चालू आहेत. तिथल्या कामात अधिकाऱ्याचे दुर्लक्ष होत आहे. परंतु 300 ते 400 मीटरच्या छोट्या रस्त्याच्या कामामध्ये कर्मचाऱ्याचे निलंबन करणे सदर बाब हि अन्याय असून मानवाधीकार संघटना अश्या कर्मचाऱ्यावर होत असलेला अन्याय सहन करणार नाही. याची दक्षता घेऊन आपणास विनंती आहे कि कर्मचाऱ्याचे निलंबन तातडीने रद्द करण्यात यावे. व सुरजागड अंतर्गत होत असलेल्या संपूर्ण नियमबाह्य कामाची चौकशी करण्यात यावी.अशीही मागणी या वेळी प्रणयभाऊ खुणे यांनी केली सोबतच अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाब आत्राम यांना ही लक्षात आणून देऊन संपूर्ण माहिती अवगत करून देऊन त्यांनाही निवेदन देण्यात आले
निवेदन सादर करतांना राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे पदाधिकारी उपस्तीत होते
0 Comments