वीज पडुन युवकाचा जागीच मृत्यू




#khabardarmaharashtr#onlinenewsportal#social#education#entertainment#political#crime


प्रतिनिधी राजुरा : राजुरा तालुक्यातील विरुर स्टेशन परिसरातील नलफडी गावातील २५ वर्षीय युवक शेतातून काम करून घरी परतत असताना दि. २२ ऑगस्टला दुपारी अंगावर वीज पडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. आकाश कालिदास पाकुलवार असे मृतकाचे नाव आहे.

मागील एक महिन्यापासून पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे. मात्र मागील आठवड्या पासून पावसाने दडी मारली आहे. दरम्यान दुपारच्या सुमारास नलफळी शिवारात निलगिरी शेतात आकाश पाकुलवार सह आणखी चार शेतमजूर काम करीत होते. काम करीत असताना अचानक आभाळ दाटून आले व विजाचा कडकडाट सुरू झाला. त्यामुळे पाचही मजूर घराकडे निघाले. चार शेतमजूर समोर काही अंतरावर होते व मागे आकाश होता. त्याचवेळी वाटेतच आकाशच्या अंगावर वीज पडली व त्याचा जागीच मृत्यू झाला.

Post a Comment

0 Comments