विभागीय संपादक // मारोती कोलावार
चिचेला;- मूलचेरा तालुक्यातील चिचेला येथे अवैध कोंबडा बाजारावरती धाड टाकल्याची माहिती मिळाली आहे. आज दिनांक २५/८/२०२४ रोज रविवारला कार्यवाही केली आहे या कार्यवाहीत अनेक दुचाकी व कोंबडे जप्त करण्यात आले.
सविस्तर वृत्त या प्रमाणे आहे की, चिचेला या गावात अवैध रित्या कोंबडा बाजार गेल्या हप्त्यापासून चालू झाले.
आज चिचेला येथे कोंबडा बाजार चालू आहे ही गुप्त माहिती पोलिसांना मिळताच पोलीस निरीक्षक मूलचेरा श्री.महेश विधाते यांच्या नेतृत्वात पोलीस कर्मचाऱ्यांनी कोंबडा बाजारावरती धाड टाकली असता अनेक दुचाकी व कोंबडे हाती लागले आणि तो सर्व मिळालेला मुद्देमाल गोमणी परिसरातील ट्रॅक्टर व पिकअप द्वारे मुलचेरा पोलीस स्टेशन येथे नेण्यात आले असून बातमी प्रकाशित होई पर्यंत किती मुद्देमाल मिळाला हे स्पष्ट झाले नाही.
सविस्तर माहिती पोलीस विभागाला संपर्क करून देण्यात येईल.
0 Comments