ब्रह्मपुरी प्रतिनिधी अनिल कांबळे.
दिनांक 30/08/2024 ला रोज शुक्रवार ला तहसील कार्यालय ब्रम्हपुरी येथे वंचित बहुजन महीला आघाडी तर्फे मा.मुख्यमंत्री, मा.गृहमंत्री साहेब यांना माननीय तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी ब्रह्मपुरी यांच्या मार्फत निवेदन सादर करण्यात आले.व महीलांनवरील अत्याचाराचा निषेध नोंदवीण्यात आला. सध्या देशामध्ये व महाराष्ट्रात महीलांनवर होणारे वाढत्या बलात्काराचे व अत्याचाराचे प्रमाण वाढले आहेत.राज्यातील कायदा सुव्यवस्था अंतीम घटका मोजत आहेत. गुन्हेगारांना कुठल्याही प्रकारचा वचक राहीलेला नाही.गुन्हेगारांना फाशी ची शिक्षा झालीच पाहीजे.आजची स्री ही स्वावलंबी आहे पण सुरक्षित नाही.स्री ही शिक्षणाकडे वळली.शिक्षण घेत यशाचे ध्येय गाठत गेली.ती उंच झेप घेण्यापूर्वीच काही वासनाधीन विकृती,नराधम तीचे पंख छाटायला तयार असतात. स्री ला स्वातंत्र्य मिळाले पण कुठे? बलात्काराची शिकार होऊन कित्येकांना आपला जीव गमवावा लागतो.
1) हॉस्पीटल मध्ये बलात्कार,
2) शाळेत बलात्कार,
3)मंदिरात बलात्कार
मुली/महीला नक्की कुठे सुरक्षित आहेत...?
"कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा"...?
लहान मुले मुलींना खाऊचे आम्हीच दाखवून त्यांच्यावर दोन दोन तीन तीन उच्चशिक्षित लोक सुद्धा बलात्कार करीत असताना दिसत आहेत शिक्षक विद्यार्थीनीवर लैंगिक अत्याचार करतांनी दररोज वर्तमानपत्रातुन दिसू लागली आहे
महीलांना सुरक्षा द्या मुख्यमंत्री साहेब, तुमची लाडकी बहीण व तीची लेक सुरक्षित नाहीत
महाराष्ट्रात अराजकता पसरलेली आहे.
एकीकडे म्हणता "बेटी बचाव,
बेटी पढाव"आणि जिकडे पहावा तिकडे मुली लैंगिक अत्याचाराचे बळी पडत आहेत ही बाब खरंच निंदनीय आहे
या गंभीर बाबीची दखल घेऊन सरकारने लवकर ठोस पावले उचलावी अशी मागणी करण्यात येत आहे घरच्या प्रमुखांना पत्नी व मुलगी घराबाहेर पडली ती सुरक्षित घरी वापस येईलच याची चिंता सतावू लागली आहे
महीलांना व मुलींना सुरक्षा जर मिळाली नाही तर वंचित बहुजन महीला आघाडी ब्रह्मपुरी रस्त्यावर उतरून आंदोलन करेल असा इशारा वंचित बहुजन महीला आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षा लिनाताई रामटेके यांनी यावेळी दिला.निवेदन देतांना लता मेश्राम, चंदा माटे,प्रतिमा डांगे,करुणा मेश्राम. वंदना कांबळे,प्रिया हरडे, विजया खोब्रागडे,निरू खोब्रागडे, योगिता रामटेके.सुकेशनी चौधरी,शिला बनकर व इतर महिला कार्यकर्त् उपस्थित होत्या.
.jpg)
0 Comments