हजारोच्या संख्येने गावकरी एकत्र ,उत्सवा मधून अनेक सामाजिक व शैक्षणिक संदेश देतानी तान्हा शेतकरी
देसाईगंज;- दि.३/९/२०२४ आज मंगळवार ला तालुक्यातील कोरेगांव येथे मागील तीन वर्षाची परंपरा जपत या वर्षी सुध्दा श्री गुरुदेव सेवा मंडळ आणि जय हनुमान मंदिर समिती यांच्या वतीने गावामध्ये तान्हा पोळा स्पर्धेचे चे आयोजन करण्यात आले. यात अनेक लहान लहान बालगोपाल बहुसंख्येने आपले नंदी बैल यांची सुंदर सजावट करून ,आपले शेतकरी या रूपात वेशभूषा साकारून ,व आपल्या माध्यमातून समजला आपल्या बैला बदल प्रेमभाव कसे जपता येईल ,बदलत्या युगात बैल यांची कमी होणारी संख्या , समाजात होणाऱ्या नारीशक्ती चा छड,याबद्दल असे आकर्षित संदेश आजच्या या कार्यक्रमा प्रसंगी या बालगोपाल यांनी समाजाला दिला.
या कार्यक्रमा चे पाच असे बक्षीस वितरण होते आणि सर्वांना प्रोत्साहन बक्षीस सुध्दा होते ,सगळ्या कार्यक्रमा चे नियोजन योग्य रित्या मंडळाने पार पाडली . या कार्यक्रमा प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून श्री उईके सर .माजी उपसभापती वडसा. श्री मुंगमोडे सर माजी.प्राचार्य किसान विद्यालय कोरेगांव ,सौ.कुंदाताई गायकवाड सरपंच ग्राम .पं.कोरेगांव,श्री धनंजयजी तिरपुडे उपसरपंच ग्राम. पं.कोरेगांव,श्री श्यामजी उईके पोलीस पाटील कोरेगांव,श्री विस्तारीजी मस्के अध्यक्ष तंटामुक्त समिती कोरेगांव, श्री खुशाल जी धक्काते ,श्री पुरशोत्तम्म जी
भागडकर ,सुरेशजी पर्वतकार ,
आणि सर्व गावकरी मंडळी या कार्यक्रमात हजरोच्या संख्येने सहभागी झाले आणि बालगोपाल यांचा आनंद द्वीगुनित केला.


0 Comments