तोरगाव खुर्द येथे गणेशोत्सवानिमित्त "डान्स कॉम्पिटिशन" स्पर्धेचे आयोजन माजी जि. प. सदस्य प्रमोद चिमुरकर यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न




ब्रम्हपुरी प्रतिनिधी //अनिल कांबळे

             _खास गणेशोत्सव निमित्ताने तालुक्यातील तोरगाव (खुर्द) येथे बाल युवा गणेश मंडळ, तोरगाव (खुर्द) यांच्या वतीने गावातील बाल कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी "डान्स कॉम्पिटिशन" स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.  या *स्पर्धेचे उद्घाटन माजी जिल्हा परिषद सदस्य प्रमोदभाऊ चिमूरकर यांच्या हस्ते पार पडले.*_

                         _यावेळी सहउद्घाटक म्हणून अमित कन्नाके युवक काँग्रेस ब्रम्हपुरी, कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शरदजी अलोने सरपंच तोरगाव (खुर्द) तर कार्यक्रमाचे उपाध्यक्ष म्हणून हिरालालजी कुथे धान्य व्यापारी उपस्थित होते. तर प्रमुख अतिथी म्हणून मोरेश्वर ढोरे ग्रा. पं. सदस्य, शरद कुथे अध्यक्ष शा.व्य.स., सुनील दंडारे, योगेश दंडारे, राजेंद्र मीसार, जया मिसार पोलीस पाटील, जया देशमुख, संगीता कुथे ग्रा. पं. सदस्या, रेखा नखाते ग्रा. पं. सदस्या, होषीचंद्र बेदरे, विमल कुथे, ममता शेंडे अंगणवाडी सेविका, शीतल मिसार ग्रा. पं. सदस्या, प्रदीप देशमुख, मनीष माकडे, गोपीचंद्र बेदरे, धनपाल देशमुख, प्रदीप मोहुर्ले. आदी मान्यवर उपस्थित होते._

                    _या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी प्रमोदभाऊ चिमुरकर म्हणाले की, गणेश चतुर्थीला महाराष्ट्रातील गणेश भक्तांच्या घरी तसेच सार्वजनिक गणेश मंडळांमध्ये गणेशाचे आगमन होते आणि वातावरण चैतन्याने भरून जाते. लहान मुलांना संगीत, नृत्य, नाटक, कला आणि साहित्य यासह विविध क्षेत्रांमध्ये त्यांची प्रतिभा प्रदर्शित करण्यासाठी असे सांस्कृतिक कार्यक्रम एक व्यासपीठ प्रदान करतात. हे सण विद्यार्थ्यांमध्ये समाजाची भावना निर्माण करण्यास आणि सांस्कृतिक देवाणघेवाणीला उत्तेजन देण्यासही मदत करतात व अश्या सांस्कृतिक कार्यक्रमांमधून मुलांच्या कलागुणांना प्रोत्साहन मिळते. असे मत त्यांनी व्यक्त केले._ 

                    _या स्पर्धेला गावकऱ्यांनी उत्तम प्रतिसाद दिला. डान्स कॉम्पिटिशनच्या यशस्वीतेसाठी नवनिर्माण बाल युवा गणेश मंडळ, तोरगाव (खुर्द) सर्व सदस्यांनी अथक परिश्रम घेतले._

Post a Comment

0 Comments