शवाविच्छेदन टाळण्यासाठी पालकांनी मृतदेह स्वतः नेले त्या दोन बालकांच्या मृत्यू प्रकरणात आरोग्य विभागाचा खुलासा शवविच्छेदन अहवालानंतरच पुढील कार्यवाही




गडचिरोली दि. ६: जीमलगट्टा प्राथमिक आरोग्य केंद्रा अंतर्गत दोन मृत बालकांना शववाहिका न मिळाल्याबाबत विविध माध्यमातून प्रसिद्ध वृत्तासंदर्भात शवविच्छेदन टाळण्यासाठी पालकांनी मृतदेह स्वतः नेला असल्याचा खुलासा आरोग्य विभागाने केला आहे.


 आरोग्य विभागाच्या खुलाशानुसार अहेरी तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र जिमलगट्टा अंतर्गत येर्रागड्डा गावातील बाजीराव रमेश वेलादी वय ६ वर्ष व दिनेश रमेश वेलादी वय ३ वर्ष ह्या दोन भावंडांना प्राथमिक आरोग्य केंद्र जिमलगट्टा येथे दिनांक ४ सप्टेंबर २०२४ ला सायंकाळी ५ ते ५.३० च्या दरम्यान त्यांच्या पालाकांनी आणले असता वैद्यकीय 

अधिकारी डॉ. दुर्गा जराते यांनी तपासणी केली व दवाखाण्यात आणण्यापुर्वीच त्यांचा मृत्यु झाला

असल्याचे दिसुन आले. घटनेच्या दिवशी प्राथमिक आरोग्य केंद्र जिमलगट्टा येथे डॉ. दुर्गा जराते वैदयकीय अधिकारी गट ब, श्रीमती सुलोचना चिलमकर आरोग्य सहाय्यीका, श्री.सुभाष आत्राम परिचर, कुमारी स्नेहल चौधरी प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी, आशीष पस्पुनुरवार कंत्राटी

वाहन चालक, शकंर पेरगु डाटा एन्ट्री आपरेटर उपस्थित होते.

मृत बालकांना नेण्याकरीता रुग्णवाहीका उपलब्ध करुन देण्यात येईल असे वैदयकीय अधिकारी यांनी पालकांना सांगितले. परंतु शवविच्छेदनासाठी घेवुन जाणार अशी शंका आल्याने त्यांनी रुग्णवाहीकेची वाट न पाहता स्वतः मृतदेह स्वगावी येर्रागड्डा येथे घेऊन गेले. वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र जिमलगट्टा यांनी तात्काळ पोलीस स्टेशन जिमलगट्टा येथे सदर घटनेबाबत लेखी स्वरुपात कळविले. पोलीसांनी दिनांक ५ सप्टेंबर २०२४ ला सकाळी ६ वाजताच्या सुमारास प्राथमिक आरोग्य केन्द्राच्या

रुग्णवाहीकेने येर्रागड्डा येथे जावुन पालकांना समजावुन मृत बालकांचे शव तपासणीकरिता उपजिल्हा रुग्णालय अहेरी येथे आणले व शवविच्छेदन आटोपुन त्याच रुग्णवाहीकेने त्यांना त्यांच्या गावी येर्रागड्डा येथे सोडण्यात आले.

दिनांक २९ व ३० ऑगस्ट रोजी आरोग्य कर्मचारी यांनी नियमित गृहभेटी दरम्याण श्री रमेश वेलादी यांचे घरी भेट दिली असता आई व्यतीरिक्त कुणालाही आरोग्याबाबत तक्रार नव्हती. तसेच त्यांचे रक्तनमुणे सुद्धा हिवतापाकरिता दुषीत आढळुन आलेले नाही. दिनांक ४ सप्टेंबर २०२४ ला आरोग्य सेवक श्री आर.एम.मडावी यांच्या गृहभेटी दरम्यान सदर कुटुंब घरी उपस्थीत नव्हते. तसेच या दरम्यान सदर

कुटुंबातील कुणीही शासकीय आरोग्य यंत्रणेशी संपर्क साधला नाही. या संपूर्ण प्रकरणात शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढिल कार्यवाही करण्यात येईल, असे जिल्हा आरोग्य अधिकारी प्रताप शिंदे यांनी कळविले आहे.

०००

Post a Comment

0 Comments