ब्रह्मपुरी प्रतिनिधीस// अनिल कांबळे
ब्रम्हपुरी वरून जवळ असलेल्या पिंपळगाव ( भो.) येथे दि. 24/09/2024 मंगळवार रोजी भारत सरकारच्या 10000 एफ पी ओ निर्माण व संवर्धन योजनेअंतर्गत राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक (नाबार्ड) द्वारा अर्थसहाय्यित कृषी विभाग (आत्मा) द्वारे निरीक्षित व आय एफ एफ डी सी द्वारा क्रियांवित कृषीउडान फार्मर प्रोड्युसर कंपनी लि. सावलगाव ता ब्रम्हपुरी जि. चंद्रपूर यांची तिसरी वार्षिक सर्वसाधारण सभा ग्राम पंचायत सभागृह पिंपळगाव (भो) येथे संपन्न झाली.
या प्रसंगी बोलताना कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून कृषी अधिकारी श्री. एस एम दहीवले यांनी कृषी विभागाच्या योजना व पीक पद्धती या बाबत मार्गदर्शन केले.
प्रमुख पाहुणे प्रसंगी बोलताना मा. ललिता चवरे कनिष्ठ प्रबंधक आय एफ एफ डी सी (IFFDC) वाशिम यांनी शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून प्रक्रिया उद्योग साधून शेतकऱ्यांनी आपला उत्पन्नात वाढ करावी असे सांगितले.
मा श्री. चेतन उमाटे क्षेत्रीय अधिकारी ईफको यांनी नॅनो उर्वरकांचा वापर करून पिकाचा व मातीचा पोत सुधारतो व ड्रोन द्वारे फवारणी करून नवीन तंत्रज्ञानाचा वापर करावा असे सांगितले
0 Comments