गडचिरोली जिल्ह्यातील मानधनावर काम करणारे विद्युत सेवकांना राज्य सरकार ने न्याय द्यावा
कुरखेडा;- तालुक्यातील मौजा गुरनोली येथील विद्युत सेवक राहुल आनंदराव उसेंडी वय वीस वर्ष हा होतकरू विद्युत सेवक म्हणून शेतकऱ्यांच्या विविध समस्या हिरिरीने दूर करीत असतो व नेहमी विद्युत सेवक म्हणून सर्वसामान्य नागरिकांचे गावातील सर्वांसाठी सेवा बजावत असतो नुकताच सदर विद्युत सेवक राहुल आनंदराव उसेंडी हा येथील एका शेतकऱ्याच्या इलेक्ट्रिक समस्या करिता शेतातील डीपी जवळील, पोलवर चढला व त्या ठिकाणी करंट असल्याने तेथून खाली पडला व त्याचा संपूर्ण चेहरा बिघडला व सदर रुग्ण अति रक्तस्त्रावामुळे बेशुद्ध झाला व माहिती मिळताच राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रणय भाऊ खुणे यांनी तात्काळ आपल्या वाहनातून या विद्युत सेवकास तालुका रुग्णालय येथे भरती केले व तिथून नागपूर येथे भरती करून घेतले पुढील उपचार स्वखर्चाने करून घेतले व राहुल उसेंडी या युवकाचे जीव वाचले आणि वेळोवेळी आवश्यक ती मदत राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेच्या वतीने तत्परतेने प्रणय भाऊ यांनी केले व नुकताच संपूर्णपणे दुरुस्त होऊन राहुल घरी परत आला व पुन्हा राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेने वतीने त्याची भेट घेऊन त्याला पुन्हा प्रणय भाऊ यांचे हस्ते आर्थिक मदत करण्यात आली* *यावेळी राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रणय भाऊ खुणे यांनी सांगितले गडचिरोली जिल्ह्यातील समस्त विद्युत सेवक यांचे मानधनात वाढ करण्यात यावी तसेच विद्युत वितरण कंपनीच्या वतीने जिल्ह्यातील समस्त विद्युत सेवक यांना आवश्यक सुरक्षा किट तसेच यांच्या जीवाचे संरक्षण विमा सुद्धा राज्य शासनाच्या वतीने काढण्यात यावे तसेच गडचिरोली जिल्ह्यातील समस्त विद्युत सेवक यांना विद्युत विभागात सामावून घेण्यात यावे व राज्य शासनाच्या नियमानुसार समस्त विद्युत सेवकांना लाभ देण्यात यावा अशी मागणी राज्य सरकार कडे केली व या विषयावर बोलताना प्रणय भाऊ खुणे यांनी सांगितले जिल्ह्यातील विद्युत सेवक तसेच कोतवाल यांचे समस्या शासन दरबारी आपण मांडणार व यांना न्याय मिळाल्याशिवाय गप्प बसणार नाही असे सांगितले यावेळी प्रामुख्याने गावातील देवानंद पाटील पुणे विवेकजी बुद्धे उपाध्यक्ष कोहळी समाज संघटना जिल्हा गडचिरोली भजन कीरंगे मंगेश कराडे तालुका अध्यक्ष राष्ट्रीय मानवाधिकार संघटना तालुका कुरखेडा जिल्हा उपाध्यक्ष पुरुषोत्तम गोबाळे ,सत्यवान दुतकोवर व राहुलचे वडील आनंदराव उसेंडी व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते
0 Comments