प्रतिनिधी // राहुल दोंतुलवार
अहेरी- स्थानिक श्री. शंकरराव बेझलवार कला व वाणिज्य महाविद्यालयात 26 नोव्हेंबर 2024 रोजी संविधान दिनाचे औचित्य साधून प्राचार्य डॉ. विजय इ. सोमकुवर यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. आंबेडकर विचारधारा विभाग व राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमानाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
महाराष्ट्र शासन शिक्षण संचालन (उच्च शिक्षण) यांच्या परिपत्रकानुसार भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षात भारतीय संविधानाचे तत्त्वज्ञान, मूल्य, आदर्श व संविधान निर्मितीचा उद्देश स्पष्ट करण्याकरिता संविधान प्रस्ताविका उद्देशिकेचे अनन्य साधारण महत्व आहे. यास्तव भारतीय राज्यघटनेबाबत जागरूकता वाढविण्यासाठी भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्याचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी कार्यक्रमाचे आयोजक प्रा. प्रभाकर घोडेस्वार यांनी सर्व विद्यार्थ्यांच्या उपस्थितीमध्ये भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करून घेतले.
याप्रसंगी अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजय इ. सोमकुवर होते तर विचार मंचावर प्रा. मंगला बनसोड मॅ, प्रा. ज्ञानदीप आवारी, प्रा. प्रभाकर घोडेस्वार उपस्थित होते. कार्यक्रमाला प्रा. सी. गौरकार, प्रा. एस. लांडे, प्रा. जी. तेलंग, प्रा. टी. शेख, प्रा. पी. जवादे मॅ, प्रा. आर. घोणमोडे मॅ, श्री. डी. जाकेवार, श्री. बी. पेंदोर, श्री. पी. शिंपी तसेच शिक्षकेतर कर्मचारी व बहुसंख्येने विद्यार्थी उपस्थित होते.

0 Comments