कोडीगावं:- ग्रामपंचायत आंबटपल्ली अंतर्गत येत असलेल्या कोडीगाव येथील वार्ड क्र. ३ या दलित वार्डात एकच हातपंप असून ते देखील निकामी झाल्यासारखे आहे म्हणजेच त्या हातपंपाची साखळी तीन महिन्यांपूर्वी तुटून गेल्याने पाणी भरणे अशक्य झाले, याची माहिती अनेक वेळा सरपंचाला देऊन सुद्धा नविन साखळी लावून न दिल्याने वार्डातील लोकांनीच ऍल्युमिनियमच्या ताराने साखळी जोडून कशी-बशी वापर करण्याचा यथाच्च प्रयत्न देखील केलेला होता परंतु हातपंपातून पाहिजे त्या प्रमाणात पाणी येत नसल्याने वार्डातील महिला त्रस्त आहेत. त्याच वार्डासमोर एक सार्वजनिक विहीर असून महिला त्या विहिरीतून पाणी भरण्याचा प्रयत्न केले परंतू त्या विहिरीत अनेक महिन्यांपासून ब्लिचिंग पावडर न टाकल्याने ते पाणी हिरवेगार होऊन पिण्यायोग्य नसल्याने पिण्याच्या पाण्यासाठी दुरवर असलेल्या हातपंपाचे पाणी आणावे लागत आहे.
या विज्ञान युगात सर्व सोयी-सुविधा उपलब्ध असतांना देखील चक्क सरपंचाच्याच गावात महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याचे हदय विदारक दृश्य पहावयस मिळत आहे.
सरपंचाच्याच स्वतः च्या गावात हि परिस्थिती असेल तर दुसऱ्या गावांची अवस्था कशी असेल? असा प्रश्न उपस्थित करून अखेर आबंटपल्ली ग्रामपंचायतमध्ये चाललं तरी काय? असा प्रश्न ग्रामस्थांकडुन उपस्थित केला जात आहे.
सदर बाबीकडे संबंधित अधिकार्यांनी या दलीत वार्डाकडे जातीने लक्ष देऊन हातपंप लवकर दुरुस्त करून द्यावें या अपेक्षेत सरपंचाच्याच गावातील महिलांची आर्त हाक!
खरचं सबंधित अधिकारी जातीने लक्ष देतील काय? या दलीत महिलांना हक्काच पाणी मिळेल काय ? याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

0 Comments