अहेरी:-अहेरी विधानसभा विस्ताराने खूप मोठा असला तरी अजून पर्यंत पाहिजे तितका विकास झाला नाही,या मुळे अहेरी विधानसभेला नवा चेहरा नवा नेतृत्व हवा अशी चर्चा विधासभेतील युवा पिढी व समस्त नागरिकांमध्ये चर्चा चालू आहे.
अहेरी विधानसभेत एटापल्ली, भामरागड,मूलचेरा,अहेरी,सिरोंचा या तालुक्यांचा समावेश आहे. या तालुक्यात जास्तीत जास्त आदिवासी समुदाय वसलेला आहे.परंतु आजही प्रत्येक तालुक्यातील काही गावात विजेची समस्या तर काही गावात रस्त्यांची समस्या तर काही गावात आरोग्याची समस्या व ॲम्बुलन्स समस्या आहे. आजही ॲम्बुलन्स ऐवजी खाटेवर टाकून १० ते २० किमी पायदळ जंगल वाटेने उपचार करण्यास घेऊन जात असल्याचे विधारक दृश्य आपल्या अहेरी विधानसभेत दिसून येत आहे. चांगल्या आरोग्य यंत्रणेच्या अभावामुळे अनेक बालकांचे,गरोदर मातांचे व वयोवृधांचे बळी जातांना सुद्धा दिसून येत आहे.काही ठिकाणी गरोदर मातांना डोंग्यावरून तर काही काही ठिकाणी जेसीबीचा बकेटमधुन घेऊन जातांना दिसुन येत आहे.
अहेरी विधानसभेतील जनतेच्या मतांवर आजपर्यंत निवडून आलेले लोकप्रतिनिधी याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतांना दिसून येत आहे.फक्त मतदानाच्या वेळेस गावोगावी जाऊन सभा घ्यायच्या वेगवेगळी आश्वासने द्यायची आणि जिंकून आल्यावर ५ वर्ष वळूनही पहायचे नाही अशी पिळवणूक आजपर्यंत झालेली आहे. अहेरी विधानसभेतून आजपर्यंत निवडुन आलेले लोकप्रतिनिधी कोणी पालकमंत्री पद, राज्यमंत्रीपद, कॅबिनेटमंत्री पद भूषविलेले आहेत परंतु या क्षेत्राचा विकास मात्र शून्यच (00). या सर्व बाबींचा जनता साक्षीदार असून 2024 च्या विधानसभेत आजपर्यंत झालेल्या निष्क्रिय लोकप्रतिनिधींना त्यांची जागा दाखविण्यासाठी सज्ज आहे. जिथे तिथे सर्वत्र चर्चेत आमची दिशाभूल करणाऱ्यानां आम्ही खपवून घेणार नाही,खरोखरच अहेरी विधानसभेचा विकास करायचा असेल तर नव्या चेहऱ्याला संधी मिळणे गरजेचे आहे.एखादा सर्वसाधारण घरातील किव्हा त्या लोकांसोबत वावरलेला व्यक्तीच त्याची व्यथा समजू शकेल आणि समस्या सोडविण्याचा प्रयत्न करेल.2024 च्या विधानसभेत 'मडावी विरुद्ध आत्राम' अशी लढत पाहायला मिळत आहे.या आत्रामांपैकी तीन आत्रामांनी आमदारकीची मलाई खाल्लेली आहे. जनता यांना यांची जागा दाखविण्याच्या प्रयत्नात आहेत.
उरली भाग्यश्री आत्राम या जरी राजकारणात सक्रिय होत्या असतील तरी आजपर्यंत विधानसभा निवडणुक लढविली नाही. या वर्षी त्यांना महाविकास आघाडी कडून राष्ट्रवादी शरद पवार गटातर्फे उमेदवारी मिळालेली आहे.
नवीन चेहरा बघता हनुमंतु मडावी,व भाग्यश्री आत्राम. भाग्यश्री आत्राम या राजघराण्यातून येतात त्या धर्मरावबाबा आत्राम यांच्या सुपुत्री असुन यांनीही जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष राहिलेल्या आहेत.
हनुमंतु मडावी हे सेवानिवृत्त सहाय्यक वनसंरक्षक मूळचे आलापल्ली येथील रहिवासी असून सर्वसाधारण घराण्यातील आहेत जास्तीत जास्त काळ हे आदिवासी भागात काढलेला आहे.या दोघांची तुलना केली तर हनुमंतु मडावी याचं पारड भाग्यश्री आत्राम याच्यावर भारी आहे.हनमंतु मडावी हे राजकारणात नवीन आहेत,पण या क्षेत्रासाठी नवीन नाहीत.त्यांचा नोकरीचा 35 वर्षाचा कार्यकाळ या क्षेत्रात गेलेला आहे व अजय कंकडालवार यांच्या छत्रछायेखाली ही निवडणुक लढवत आहेत.
अजय कंकडालवार हे 12 ही महिने जनतेच्या संपर्कात राहत असून त्यांच्या समस्या सोडविण्यात सज्ज असतात.अहेरी विधानसभेत वेगळीच ख्याती कंकडालवारांची आहे.
मनमिळाऊ स्वभाव, लोकांना नेहमी दिलेला मदतीचा हात
हनुमंतु मडावी यांच्यासाठी बाजी मारण्यास मार्ग मोकळा असल्याचे बोलल्या जात आहे..
0 Comments