अम्ब्रिशराव आत्राम यांची बंडखोरी अहेरी विधानसभेत अजित पवार गटाला बुडविणार!





अहेरी: भाजप पक्षासाठी गेली १० वर्ष काम केल्यानंतरही भाजप ने ऐन वेळेवर पाठ फिरविल्याने अहेरी विधानसभा मतदारसंघात अम्ब्रिशराव आत्राम यांनी बंडखोरी केली आहे. त्यांनी दाखल केलेला अपक्ष उमेदवार अर्ज अजित पवार गटासाठी आशा मावळविणारा तर नाही ना? अशी भीती आता व्यक्त केली जात आहे. अम्ब्रिशराव आत्राम अहेरी विधानसभा मतदारसंघात अजित पवार गटाला बुडविणार असे चित्र निर्माण झाले आहे.


कारण की महाराष्ट्र विधानसभा महायुती मित्र पक्ष भाजप,शिंदे गट शिवसेना,अजित पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस मिळून लढत आहेत आणि अहेरी विधानसभेत महायुतीचे उमेदवार अजित पवार गट राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी धर्मरावबाबा आत्राम यांना देण्यात आली.


अम्ब्रिशराव आत्राम यांचा पत्ता काटला गेला. त्यानंतर त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आता त्यांचा प्रचार जोरात सुरू आहे व भाजपचा एक गट व भाजप समर्थक सुद्धा अम्ब्रिशरावांना  प्रचारासाठी मदत करत आहेत असे बोलले जात आहे. अम्ब्रिशराव आत्राम हे उमेदवारी अर्ज मागे घ्यावा यासाठी भाजप ने जोर सुद्धा लावला नाही याचा अर्थ भाजप  अम्ब्रिशरावांना आतून सहकार्य  करीत तर नाही ना? असा सवाल निर्माण होतो.

त्याचा फटका नक्कीच अजित पवार गटाला बसणार आहे हे मात्र नक्की!


अजित पवार गटाच्या चिंतेत वाढ...


अम्ब्रिशराव आत्राम यांनी केलेल्या बंडखोरीमुळे अहेरी विधानसभेत अजित पवार गटाला मोठा फटका बसणार आहे. या बंडखोरीची धास्ती अजित पवार गटाने घेतली आहे, या शिवाय अजित पवार गटाचे  उमेदवार धर्मरावबाबा आत्राम यांच्या चिंतेमध्ये देखील या बंडखोरीमुळे वाढ झाली आहे.

    अहेरी विधानसभेत महायुतीच्या काळात विकासाचे प्रमाण शून्यच  ऐन निवडणुकीच्या तोंडावर विकासकामांची घोषणा व मंजुरी दिली गेली. धर्मरावबाबा आत्राम यांना उमेदवारी दिल्यामुळे अहेरी विधानसभेतील भाजपचे अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी मनापासून दुखावल्याने महायुतीतील अजित पवार गटाला मदत करतीलच असे ठळक चित्र दिसत नाही त्यामुळे प्रयत्न करूनही अजित पवार गटाला डॅमेज कंट्रोल करता येणार नाही असं आता ठामपणे बोलले जात आहे, परिणामी अहेरी विधानसभेत अजित पवार गटाची वाट लागणार की काय? असे चित्र आहे.

Post a Comment

0 Comments