एकल अभियान आलापल्ली अभ्युदय युथ क्लब द्वारा आयोजित अंचल स्तरीय खेलकुद समारोह सुंदरनगर येथे सम्पन्न..




सुंदरनगर : एकल अभियान अंचल आलापल्ली येथे दिनांक 01/12/2024 ला अंचल स्तरीय खेलकूद समारोह सत्संग मंदीर सुंदरनगर येथे आयोजित करण्यात आला.

अंचल स्तरीय खेलकूद समारोहात 16 वर्षांखालील आलापल्ली अंचल मधील 10 संचाचे खेडाळू सहभागी झाले.या स्पर्धेत मुले, मुली यांची कबड्डी, 100 मी., 200 मी., 400 मी.,रनींग, लांब उडी, उंच उंडी खेळ घेण्यात आले.



खेलकूद समारोह कार्यक्रमाचे उदघाटन मारोती कोलावार सुंदरनगर संच समिती अध्यक्षयांच्या हस्ते रिबीन कापून करण्यात आले यावेळी श्री.प्रशांत जी नामनवार (अंचल संघटन प्रभारी), संजु सरकार (प्रतिष्ठित नागरिक), सौ.ज्योतिताई चौधरी ( महाराष्ट्र संभाग अभियान प्रमुख), गजानन जी मेश्राम ( P-8 प्रभाग अर्थ विभाग प्रमुख), श्री.ईश्वरजी मच्छीरके ( P-8 प्रभाग आरोग्य योजना प्रमुख),  रेणुकाताई कंचकटले ( महाराष्ट्र संभाग आरोग्य योजना प्रमुख),  अनिकेत जी तोडासे ( महाराष्ट्र संभाग हरिकथा योजना कार्यालय प्रमुख ) श्री महेश बुरमवार ( आलापल्ली अंचल अभियान प्रमुख ) व सर्व अंचल टोळी, संच टोळी, आचार्य, खेडाळू उपस्थित होते.



विद्यालय सुरूवात व सरस्वती प्रतिमेचे पुजन करून कार्यक्रम सुरूवात करण्यात आली, सौ.ज्योतिताई चौधरी महाराष्ट्र संभाग प्रमुख यांनी खेलकूद समारोह बद्दल सविस्तर मार्गदर्शन केले.श्री.प्रशांत जी नामनवार यांनी मुलांच्या जिवनात खेळाचे महत्त्व, ग्रामीण क्षेत्रातील आचार्य,खेडाळू याचं सहभाग,एकल अभियानाचे योगदान यांचे महत्त्व सांगितले.या स्पर्धेत मुले कबड्डी तोडसा संच प्रथम क्रमांक व मुली कबड्डी एटापल्ली संच प्रथम क्रमांक पटकावला.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी अंचल समिती चे सहकार्य व मार्गदर्शन लाभले. 

कार्यक्रमाला आलापल्ली अंचल मधिल आचार्य, खेडाळू , नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments