स्थानिक श्री. शंकरराव बेझलवार कला वाणिज्य महाविद्यालयात नारायना आई. ए. एस अकॅडमी, नागपूर यांच्या विद्यमाने नोंदणी व अल्पकालीन प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन दिनांक 27 डिसेंबर 2024 रोजी प्राचार्य डॉ. विजय सोमकुवर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. सदर प्रशिक्षण व नोकरीच्या संधी गडचिरोली जिल्ह्यातील युवकांना मिळाव्या या हेतूने नारायणा अकॅडमी ने जिल्हाधिकारी गडचिरोली यांच्याशी करार केला असून अकादमीने अहेरी येथे प्रशिक्षण केंद्र सुरू केले आहे. 3 ते 4 महिन्याचे प्रशिक्षण देऊन युवकांना रोजगारक्षम बनविणे व त्यांना नोकरीची संधी उपलब्ध करून देणे हा या कार्यक्रमाचा हेतू आहे.आजच्या कार्यक्रमात सुमारे 200 युवक व युवतींनी नोंदणी केली व महाविद्यालयाने सुरू केलेल्या उपक्रमास प्रचंड प्रतिसाद मिळाला. लवकरच प्रशिक्षण वर्गास सुरुवात होणार असून युवकांना बुलडोझर ऑपरेटर, डंपर ऑपरेटर, लोडर ऑपरेटर, अकाउंटिंग एक्झिक्युटिव्ह व फील्ड एक्झिक्युटिव्ह असे अनेक जॉब उपलब्ध करून दिले जाणार आहेत.
सदर उपक्रमाकरिता सर्वोदय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष मान. अरविंद पोरेद्दिवर व सचिव श्री प्रशांत पोटदुखे यांनी शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमाचे आयोजन विद्यार्थी विकास मंडळ व करिअर कट्टा यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. रवींद्र हजारे यांनी केले तर आभार प्रा. प्रभाकर घोडेस्वार यांनी मानले. अकॅडमी च्या वतीने श्री. सागर सायवनकर आणि श्री. जय कांद्रिकर यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रम संपन्न करण्यास प्रा. गजानन जंगमवार, प्रा. मंगला बनसोड, प्रा. गौरव तेलंग, प्रा. तनवीर शेख, प्रा. नामदेव पेंदाम यांनी मोलाचे योगदान दिले.
0 Comments