रेपणपल्ली;-गडचिरोल्ली जिल्ह्यातील कमलापूर हे गाव राष्ट्रसंत तुकळोजी महाराज यांच्या पावन स्पर्शाने पावन झालेली भूमी असून या गावाला संतांची भूमी अशी मान्यता आहे.
आणि याच भूमीवर सर्रार देशी विदेशी दारूची अनेक वर्षांपासून विक्री केली जाते.
कमलापूर हे गाव रेपणपल्ली पोलीस स्टेशन हद्दीत येते.जणू या कमलापूर गावाकडे पोलीस विभागाचे दुर्लक्षच आहे की काय असा प्रश्न तेथील नागरिकांना पडला.
व दारू प्रश्नावरती अनेक जागी निवेदन देऊन वैतागलेल्या गावकऱ्यांनी सामाजिक कार्यकर्ते संतोष ताटीकोंडावार यांना निवेदन सादर केले.गावकऱ्यांनी संतोष ताटीकोंडावार यांना निवेदनातून अशे म्हटले आहे की
गावात दारू विक्री व्यवसाय जोमात सुरू असल्या कारणाने अनेक युवकांचे भवीतव्य धोक्यात आले आहे.
दारूच्या व्यसनामुळे घरात बायकांना मारहाण आत्महत्या भांडणे दारू मुळे अनेकांची आर्थिक परिस्तिथी कोलमडली,बराच पैसा या व्यसनात खर्च होतो.व समाजाच्या उत्पादकतेवरही याचा उलटा परिणाम होत आहे.
निवेदनात अशेही म्हटले आहे की पोलीस स्टेशनला अनेकदा तक्रार देऊनही गावातील दारूविक्रीवर आळा बसलेला नाही.उलट मोठ्या प्रमाणात पुन्हा दारू विक्रीसुरू आहे.
अखेर वैतागलेल्या गावकऱ्यांनी सामाजिक कार्यकर्ते संतोष ताटीकोंडावार यांच्या कडे धाव घेतली व संतांची भूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कमलापूर येथील दारू विक्रीवर आडा घाला म्हणत निवेदन सादर केले.
प्रश्न असा;-कमलापूर हे गाव रेपणपल्ली पोलीस हद्दीत येत असून सर्रार देशी विदेशी दारू विक्री केली जाते.या वर पोलीस प्रशाशन अंकुश लावत नसेल कुठे तरी प्रश्नचिन्ह निर्माण होतो.व
पोलीस विभागाचे विक्रेत्यांना अभय तर नाही ना ?
पोलीस विभाग झोपेचा सोंग तर घेत नाही ना ?
बाक्स
रेपणपल्ली पोलीस प्रशाशनाला आमच्या संघटनेच्या माध्यमाने निवेदन देऊन दारूविक्रीवर आडा घालण्याचा प्रयत्न करू.तेव्हाही दारूविक्री वर अंकुश न लागल्यास संविधानिक पद्धतीने आम्ही दारूविक्रेत्यांना बंदी घालू
संतोष ताटीकोंडावार
सामाजिक कार्यकर्ते
0 Comments