निधन वार्ता माजी सभापती मुतन्ना भीमय्या पेंदाम यांचे ह्रदय विकाराच्या झटक्याने निधन

 


अहेरी : जिल्हा परिषद गडचिरोली चे माजी सभापती व धर्मरावबाबा आत्राम यांचे समर्थक मुतन्ना भीमय्या पेंदाम यांचे वयाच्या 70 व्या वर्षी हृदय विकराच्या झटक्याने निधन झाले.

मूळ गाव कोत्ता गुडम येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

आज सकाळी 8 वाजता घरी चक्कर येऊन पडले असता डा कन्ना मडावी यांच्या दवाखान्यात उपचार करण्यासाठी नेण्यात आले. त्यांनी चंद्रपूर येथे हलविण्याच्या सूचना दिल्या.

नेत असताना वाटेत आष्टी दरम्यान त्यांचे निधन झाले.

गेल्या काही वर्षांपासून ते अहेरी येथे स्थायी झाले होते.

त्यांचे मूळ गाव कोत्ता गुडम वट्रा असल्याने त्यांच्यावर तेथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

मुतन्ना पेंदाम यांची राजकीय कारकीर्द मोठी आहे. 1984 ला ते पंचायत समिती अहेरी चे सभापती होते.

1998 ते 2001 मध्ये जिल्हा परिषद गडचिरोली चे आरोग्य व बांधकाम सभापती होते. स्थानिक राजकारणावर त्यांचे मोठे वर्चस्व होते. 

धर्मरावबाबा आत्राम यांचे ते कट्टर समर्थक होते.

पूजा पेंदाम ही त्यांची मुलगी ग्राम पंचायत वटरा ची सरपंच आहे.

Post a Comment

0 Comments