बंदरांच्या त्रासा पायी शेतातील बांधावरील तुरीचे पीकच कापले

 


ब्रह्मपुरी प्रतिनिधी //अनिल कांबळे 

ब्रह्मपुरी;- तालुक्यातील पिंपळगाव भोसले येथील शेतकरी  वंदना बाई कांबळे हिने आपल्या शेतीतील बांधावर तुरीच्या पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड केली होती परंतु वन्यप्राणी म्हणजेच बंदर यांचा धुमाकूळ मोठ्या प्रमाणामध्ये होता बंदरांना आपली तूर खाऊ नये म्हणून काडी धरून हाकलायची परंतु बंदराचा कळप हा खूप मोठा असल्यामुळे शेताच्या भोवताली असलेले पीक बंदर खात होते बंदरांना हाकल्य शेतकरी बांधव निरनिराळ्या आयडिया करतो जसे कुत्र्याच्या आवाजाचा मांजरीच्या आवाजाचा जो पोगा असतो तो सुद्धा सुरू केल्यानंतर बंदर पडून जात नाही अर्ध्या अर्ध्या तासाने पुन्हा कळपचे कळप येत असतात तसेच दोन-तीन दिवसानंतर सुद्धा ते सतत फेरफटका मारत असतात व पिकाची नूकसान करीत असतात

यासाठीनंतर सुद्धा बंदर पुन्हा अर्ध्या तासानंतर पुन्हा कळप घेऊन त्या शेतावर येत असतो अशा वेळेस बंदराचा मुखिया ज्याला आपण भक्या म्हणतो तो कधीकाळी शेतकऱ्यावर सुद्धा धावून पडत असल्यामुळे बंदरांना हाकलणे हे फार मोठे जीवावरचे संकट आहे अशा वेळेस यांच्या त्रासा पायी आपल्या बांधावरचे उभे पीक अजून पर्यंत शेंगा अदरकच्याच होत्या तरी पण याच्या त्रासामुळे पूर्ण शेतातील तुरी कापून टाकल्या म्हणजे म्हणतात" ना गळा कापला खोकला ".गेला वन्यप्राण्यापासून शेतकऱ्यांचे पिकाचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होत आहे तेव्हा हे बंदर गावामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये येऊन शेत पिकाचे नासदूस करतात शासनाने वन्य प्राण्याचा म्हणजेच बंदराचा जेर बंद करावे अन्यथा बंदराच्या त्रासा पायी गावातील नागरिक दहशतीखाली जगत असतात तेव्हा शासनाने यांचा बंदोबस्त करावा व शेतकऱ्यांना सुख समाधानाने जगू द्यावे अशी मागणी या भागातील नागरिक करीत आहेत

Post a Comment

0 Comments