अहेरी;- अहेरी विधानसभेतील प्रत्येक खरेदी केंद्रावर धान खरेदीला सुरुवात होत आहे.अश्यातच सामाजिक कार्यकर्ते संतोष ताटीकोंडावार यांनी.धान खरेदी केंद्रावरील शेतकऱ्यांच्या लुटमारीचा विषय घेत जर का शेतकऱ्यांची खरेदी केंद्रावर लूट करत असाल तर गाठ माझ्याशी आहे. अशे स्पस्ट आवाहनात्मक संदेश धान खरेदी केंद्रांना दिला आहे.अविका संस्था व फेडरेशन हमीभावाणे धान खरेदी करतात
आदिवासी विकास महामंडळाने ठरवून दिलेल्या अटीशर्ती नुसार हमीभाव धान खरेदी कारावे लागते.
शासनाच्या नियमाप्रमाणे 40.600 घ्यायचे धोरण आहे परंतु सर्रार शेतकऱ्यांकडून 41.600 किव्हा 42 केजी घेतले जाते.जिल्ह्यात मोठया प्रमाणात शेतकरी वर्ग अशिक्षित असल्यावायून धान खरेदी केंद्रावर त्यांची दिशाभूल करून पिळवणूक केली जाते. व दोन ते अडीच किलोची लूट केली जाते.
या मुळे शाशन धोरणाचा फायदा शेतकऱ्यांना होतांना दिसत नी उलट शेतकऱ्यांचे नुकसान होतांना दिसते. याच पिळवणुकीला थाम्बविण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते संतोष ताटीकोंडावार यांनी शेतकरी बांधवांना आवाहन केले आहे. की
एखाद्या धान खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांची लूट होत असेल त्याबाबत चा जाब व्यवस्थापक किव्हा सचिवांना विचारावा
अशी होतेय केंद्रावर लूट...
काही धान खरेदी केंद्रांवर साध्या वजन काट्यावर धान मोजणी केली जाते. इलेक्ट्रॉनिक्स वजनकाटे असताना साध्या काट्यावर मोजणी का? हाच खरा संशोधनाचा विषय आहे. इलेक्ट्रॉनिक्स वजन काट्यातही सेटिंग केली जात असल्याचा आरोप केला जात आहे. धानाचा कट्टा 40 किलोचा असतो. तो मोजणी करताना तोलारी 41 ते 42 किलो वजन घेतात. एका कट्याच्या मोबदल्यात दोन कट्टे मांडतात शिवाय कट्टा जमिनीला टेकेल एवढे झुकते माप घेतले जाते. 40 किलोच्या कट्टयावर एक किलो पासंग गृहीत धरले तर एका क्विंटलवर दोन ते अडीच किलो अधिकचे माप धान खरेदी केंद्रांवर घेतले जात असल्याचे दिसून येते.
ओलाव्याच्या नावावर चार किलो धानाची कपात
केंद्रावर ओलाव्याच्या नावावर 40 किलोमागे चक्क दोन ते अडीच किलो अधिक धान शेतकऱ्यांकडून घेतले जात असल्याची ओरड आहे. हा प्रकार अजिबात नवीन नाही, मात्र, शेतकरी मुकाट्याने सहन करतात, ही खरी शोकांतिका आहे. या प्रकारातून संस्था पाहिजे तेवढ्या मोठ्या झाल्याचे दिसून येत नाही. मात्र काही संस्थाचालक गब्बर झाले आहेत. दरवर्षी होणारा हा सर्वात मोठा घोटाळा आहे.
अधिकारी, कर्मचारी नावापुरतेच
धान खरेदी केंद्रावर कुठलाही गैरप्रकार होऊ नये, यासाठी दक्षता पथके आणि अधिकारी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र, खरेदी केंद्रावर सर्रापणे नियमांचे उल्लघंन केले जात असल्याने नावापुरते देखरेखीसाठी पणन विभागाचे कर्मचारी नियुक्त असतात. त्यांच्या डोळ्यात धूळ झोकून हा प्रकार केला जात आहे.
0 Comments