जवळजवळ १० महिन्यांचा काळ लोटूनही तेंदुपत्ता संकलन मजुरीची प्रतिक्षा संपता संपेना.




आंबटपल्ली :- ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या गावांतील तेंदुपत्ता संकलनाचे जाहिर लिलाव यंदा ( २०२४ ) करण्यात आले नाही. याचाच फायदा घेत चिचेला, आंबटपल्ली,  कोडीगावं येथिल ग्रामकोष समिती अध्यक्षांनी कंत्राटदारासोबत संगनमत करून २८ नोव्हेंबर २०२३ रोजी गडचिरोली येथे जाऊन में. जोत्सना मोटर्स सावलीच्या नावाने गुप्तमार्गाने पैसे घेऊन करारनामा केले, मात्र याची भनकही जनतेला लागू दिली नाही.

    मे(२०२४) महिण्याच्या पहिल्याच आठवड्यात तेंदुपत्ता संकलनाला सुरुवात झाली. आणि अवकाळी पावसामुळे एक दिवसा आळ, दोन दिवसा आळ असे करून एकूण तीन दिवस तेंदुपत्ता संकलन करून टेंडर भरण्याच्या अगोदरच संकलन बंद करण्यात आले. एकंदरीत दहा दिवसांऐवजी तीनच दिवस मजूरी मिळाली.

    परंतू आजच्या घडीला तेंदुपत्ता संकलन करून जवळजवळ १० महिन्यांचा काळ लोटूनही जनतेला मजूरी मिळाली नाही. जानकार लोकांनी आंबटपल्ली ग्रामपंचायत मधील तेंदु संकलन करारनाना हा अवैध आहे हे लक्षात आणून दिल्यानंतर काही ग्रामकोष समिती अध्यक्षांनी संबंधित कंत्राटदाराची बाजू घेत कंत्राटदार जर पैसे दिले नाही तर ते पैसे आम्ही देऊ असे गावात घेण्यात आलेल्या बैठकीत कबुलीही दिली.

        विशेष म्हणजे आंबटपल्ली ग्रामपंचायती अंतर्गत येत असलेल्या गावांतील तेंदु संकलन केलेल्या नागरिकांचा पैसा न मिळाल्यास त्या दोषी ग्रामकोष सामिती अध्यक्षांवर गुन्हा दाखल करू असे आंबटपल्लीचे सरपंचांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले होते, परंतू या गोष्टीला १० महिन्यांचा काळ लोटूनही तेंदु संकलानाची मजूरीही मिळाली नाही आणि त्या दोषी ग्रामकोष समिती अध्यक्षांवर गुन्हा दाखल होऊन कार्यवाही देखील झालेली नाही.

     त्या ग्रामकोष समिती अध्यक्षांवर गुन्हा दाखल करु,असे ग्रामपंचायत आंबटपल्लीचे सरपंच यांनी प्रसिद्धी पत्रकात प्रसिद्ध करताच *खबरदार महाराष्ट्र न्युज नेटवर्क'ने* बातमी प्रसारित करताच त्या ग्रामकोष समिती अध्यक्षांचे दाबे दणानले होते आणि त्या अध्यक्षांपैकीच कोडीगाव येथील ग्रामकोष समिती अध्यक्ष तुळशीराम कडते यांनी तर चक्क बाजी पलटवत माझी कसवणूक करून स्वाक्षरी करून घेतले आणि त्या मोबदल्यात मला दहा हजार रुपये देखील दिल्याची कबुली दिली.

       स्वतःच्या स्वार्थापोटी गरीब जनतेच्या पोटावर लात मारणार्‍या तेंदुपत्ता कंत्राटदार व ग्रामकोष समिती अध्यक्षांवर कार्यवाही होईल काय ? जनतेचा मजुरीचा पैसा जनतेला मिळेल काय ? असा गंभीर सवाल गावकर्‍यांकडुन केली जात आहे .



त्या ग्रामकोश समिती अध्यक्षावर गुन्हा दाखल करू ही तर सरपंचाची स्टंटबाजी


आंबटपल्ली ग्रामपंचायतीच्या सरपंचाने चक्क त्या ग्रामकोष समिती अध्यक्षांवर गुन्हा दाखल करू.अशी भूमिका आठ ते दहा महिन्यांपूर्वी घेतली होती.यात जणू नागरिकांच्या मनात आनंद फुलु लागले आमची मजुरी आता आम्हाला मिळेल आणि दोषींवर कार्यवाही होईल परंतु ती भूमिका काही तासातच थंडी पडली,ही स्टंटबाजी कुठेतरी प्रसिद्धी मिळविण्याठी केलेली होती असे म्हणायला हरकत नाही.



मी कंत्राटदाराकडून १० हजार रुपये घेतले असे म्हणणाऱ्या कोडीगाव ग्रामकोष समिती अध्यक्षावर कारवाही का झाली नाही ?



 

कोडीगावं येथील ग्रामकोष समिती अध्यक्षांनी ग्रामपंचायत आंबटपल्ली येथे तेंदुपत्ता मजूरी संदर्भात घेण्यात आलेल्या सभेत त्यांनी सर्वासमक्ष कबुली दिली की, मी दहा हजार रुपये घेतले आणि बाकीच्या अध्यक्षांनी प्रत्येकी किती रुपये घेतले हे मला माहिती नाही, असे जाहिरपणे मान्य केल्यानंतरही या अध्यक्षावर व अन्य दोषी अध्यक्षांवर कोणत्याच प्रकारची कार्यवाही दहा महिने लाटूनही झालेली नाही आणि मजूरीही मिळाली नाही. म्हणून यंदा कोणत्या कंत्राटदारासोबत करार करायचे,कि करायचे नाही, केले तर कोणत्या पद्धतीने करायचे ? या संभ्रमात जनता आहे. पाहूयात खरचं जनतेच्या या प्रश्नांना योग्य न्याय मिळेल काय.

Post a Comment

0 Comments