गडचिरोल्ली;- दिरंगी आणि फुलनार या गावांमध्ये गेल्या काही दिवसांपासून माओवाद्यांनी तळ उभारल्याच्या विश्वासार्ह माहितीच्या आधारे, काल दिनांक 10/02/2025 रोजी अपर पोलिस अधीक्षक प्रशासन आणि अपर पोलिस अधीक्षक अहेरी यांच्या नेतृत्वाखाली १८ सी६० चे पथक आणि सीआरपीएफच्या क्यूएटी चे 2 पथक रवाना करण्यात आले होते.
सदर ठिकाणी आज सकाळी पोलिसांकडून घेराबंदी करण्यात आली असता दिवसभरात माओवादी आणि पोलीस पथकांमध्ये गोळीबार सुरू होता. पोलिसांच्या संयुक्त पथकाने माओवाद्यांचा तळ उद्ध्वस्त केला असून नक्षल साहित्य आणि विविध वस्तू जप्त केल्या आहेत.
सदर कारवाईदरम्यान सी६० पथकाच्या एका जवानाला गोळी लागून दुखापत झाली असून सदर जवानास तातडीने वैद्यकीय उपचारांसाठी हेलिकॉप्टरने गडचिरोली/नागपूर येथे हलवण्यात आले आहे. सदर परिसरात पोलिसांची शोध मोहीम सुरू आहे. अधिक माहिती आपणाला कळविण्यात येईल.अशे पोलीस विभागांनी कळविले आहे

0 Comments