स्वराज युवा प्रतिष्ठानच्यावतीने शिवजयंती साजरी सामाजिक,सांस्कृतिक कार्यक्रम




पेरमिली;-छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३९५ व्या जयंतीचा उत्साह पेरमिलीतनगरीत बुधवारी १९ फेब्रुवारी साजरी करण्यात आली. गावातील सामाजिक कार्यकर्त्यांनी  छत्रपती शिवरायांना अभिवादन करण्यात आले. तसेच विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले. 

यावेळी माजी सरपंच प्रमोद आत्राम यांच्या मार्गदर्शनाखाली पेरमिली गावातील प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. 

माजी सरपंच प्रमोद आत्राम म्हणाले, ‘‘छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राच्या शौर्याचे प्रतीक आहेत. महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीसाठी छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ एक नाव नसून शौर्य, समता, प्रेरणा आणि आस्थेचे केंद्र आहे.’’युगप्रवर्तक छत्रपती शिवराय’ या विषयावर व्याख्यान झाले. व छत्रपती शिवाजी महाराजांच्या सर्व धर्म समभाव या पराक्रमाविषयी माहिती दिली.


 खुर्ची वाटप


 ६ जानेवारी २०२५ रोजी झालेल्या "भाग्यलक्ष्मी" या तिन अंकी झाडीपट्टी नाटकाचे प्रयोग *सार्वजनिक एकता नाटय कला मंडळाच्या* वतीने आयोजित करण्यात आले होते.  या नाट्य प्रयोगात भरभरून लोकांचा प्रतिसाद मिळाला व झालेल्या भाग्यलक्ष्मी या नाट्य प्रयोगाला भरघोस यशानंतर छत्रपती शिवाजी महाराजांची ३९५ व्या जयंतीचा सौचिक्त साधून पेरमिली गावातील, हनुमान मंदीर पेरमिली, बौद्ध समाज पेरमिली, आदिवासीं समाजाला एकता नाट्य कला मंडळाच्या संकल्पनेतून होणारा अवास्तव खर्च टाळून हा सामाजिक उपक्रम राबविला व  प्रत्येकी तीनहीं समाजाला  खुर्च्या वाटप करण्यात आले. व तसेच मुकबधीर व अपंग शाळेत फळ वाटण्यात आले. शिवजयंती उत्सव स्वराज युवा प्रतिष्ठानच्यावतीने सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे जल्लोषात साजरी करण्यात आली. शिवप्रेमींचा' लेझिम च्या तालावर *माय भूमी ही कर्म भूमी* या गाण्याच्या गजराने वातावरण गाजले.

या कार्यक्रमात उपस्थित गावातील सामाजिक कार्यकर्ते म्हणून सत्यनारायण येगोलपवार, साजन गावडे, बंडू दहागावकर, वासूदेव कोडापे, कवीश्वर चंदनखेडे प्रफुल ढोंगे, तुळशीराम चंदनखेडे, रजिता मुळावार, सपना बंडमवार, आदी गावातील सामाजिक कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते. संचालन श्रीकांत दुर्ग तर साई चंदनखेडे यांनी स्वराज युवा प्रतिष्ठानच्यावतीने आभार मानले.

Post a Comment

0 Comments