एटापल्ली;- येथील नगरपंचायत समोर सुरू असलेली कमला एच.पी. गॅस एजन्सी मागील काही वर्षांपासून गॅस सिलेंडरची विक्री करत आहे. मात्र, शासकीय नियमानुसार आवश्यक असलेले गोडाऊन त्यांच्याकडे नाही, असा आरोप स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.
सदर एजन्सी गॅस सिलेंडर हे त्यांच्या गॅस विक्री दुकानात किंवा आपल्या घरी ठेवत असल्याचे सांगितले जात आहे. या दोन्ही ठिकाणी दाट लोकवस्ती असून, या परिसरात मोठ्या संख्येने नागरिक राहतात. अशा परिस्थितीत जर कोणतीही दुर्घटना घडली, तर त्याची जबाबदारी कोण घेणार? असा गंभीर सवाल स्थानिक नागरिकांनी उपस्थित केला आहे.
सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक स्थिती
शासकीय नियमानुसार, गॅस सिलेंडरचे साठवण गोडाऊनमध्येच असणे आवश्यक आहे. मात्र, जर गॅस एजन्सी ही नियमांचे पालन करत नसेल, तर संभाव्य दुर्घटनेचा धोका अधिकच वाढतो. या संदर्भात संबंधित प्रशासनाने तत्काळ या गॅस एजन्सीची चौकशी करून आवश्यक कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.
प्रशासन याकडे लक्ष देणार का?
नागरिकांच्या सुरक्षेचा विचार करता, एटापल्ली नगरपंचायतीने आणि तहसील कार्यालय ,उपविभागीय अधिकारी अधिकारी कार्यलय संबंधित शासकीय यंत्रणांनी या प्रकरणाची तत्काळ दखल घेणे आवश्यक आहे. अन्यथा भविष्यात काही अनुचित प्रकार घडल्यास त्याची जबाबदारी नेमकी कोण घेणार, हाच मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. या प्रकरणी प्रशासन काय पावले उचलते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
0 Comments