प्रतिनिधी // अंकुश पुरी
शेतकरी बांधव आपल्या प्रमुख मागण्या घेऊन उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धडकणार .
गडचिरोली.;- देसाईगंज तालुक्यातील प्रत्येक गावातील शेतकरी आपल्या शेती विषयी च्या अनेक प्रमुख मागण्या घेऊन . दि .१०/०२/२०२५ उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धडकणार आहेत .
प्रामुख्याने शेतकरी बांधवांचे नेतृत्व करणारे शेतकरी नेते श्री श्यामजी पा मस्के. हे शेतकरी बांधवांचे शेती विषयी जे विद्युत कनेक्शन,विद्युत पुरवठा,विद्युत कर,तसेच मंजूर झालेल्या ऊर्जा निर्मित सोलर प्रकल्पाचे काम लकरात लवकर पूर्ण करणे, शेतकऱ्यांना रब्बी हंगाम पिकासाठी २४ तास वीज पुरवठा करण्यात यावा, शेतकऱ्यानं कृषीपंपाचे विद्युत कनेक्शन लवकरात लवकर देण्यात यावे , अशा प्रकारच्या अनेक मागण्या घेऊन मोर्चा काढण्यात येणार आहे. तरी या मोच्या करीता जास्तीत जास्त संख्येने शेतकरी बांधवांनी उपस्थित राहावे असे विनंती शेतकरी नेते यांनी तमाम शेतकरी बांधवांना केली....
0 Comments